त्रिनिदाद : एक, दोन नाही, तर तीन कॅप्टन. वेस्ट इंडिज क्रिकेट टीममध्ये आता हेच दिसणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून याची सुरुवात होईल. टेस्टमध्ये क्रेग ब्रेथवेट वेस्ट इंडिजच नेतृत्व करेल. त्याशिवाय वनडे आणि T20 मध्ये दोन वेगवेगळे कॅप्टन असतील. हा स्पिल्ट कॅप्टन्सीचा प्रयोग थोडा नवीन आहे. आतापर्यंत स्पिल्ट कॅप्टन्सीचा प्रयोग रेड बॉल आणि व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये झाला आहे. म्हणजे टेस्ट आणि मर्यादीत ओव्हर्सच्या क्रिकेटसाठी दोन वेगवेगळे कॅप्टन्स असतात. पण वेस्ट इंडिजसाठी तिन्ही फॉर्मेटमध्ये वेगवेगळे कॅप्टन्स असतील.
कशी असेल वेस्ट इंडिजच्या कॅप्टनशिपची रचना?
वेस्ट इंडिजने शे होपला वनडे टीमच कॅप्टन बनवलय. रोव्हमॅन पॉवेलकडे T20 टीमची धुरा सोपवलीय. याआधी वनडे आणि टी 20 मध्ये निकोलस पूरन कॅप्टन होता. त्याने मागच्यावर्षी झालेल्या टी 20 वर्ल्ड कपनंतर कॅप्टनशिपचा राजीनामा दिला. होप आणि पॉवेल दोघांनी पूरनच्या नेतृत्वाखाली उपकर्णधारपदाची जबाबदारी संभाळली आहे. आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यात हे दोघे पहिल्यांदा कॅप्टनशिप करताना दिसतील.
बालपणीच स्वप्न पूर्ण झालं
वेस्ट इंडिज टीमच नेतृत्व करण्याआधी शे होपकडे बारबाडोस टीमचं नेतृत्व करण्याचा अनुभव आहे. त्याशिवाय वनडे क्रिकेटमध्ये त्याचा शानदार रेकॉर्ड आहे. त्याने 48.95 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. भारतात वनडे वर्ल्ड कप होणार आहे. या टुर्नामेंटमध्ये वेस्ट इंडिजला स्थाना मिळवून देण्याचे टार्गेट होपसमोर आहे. वेस्ट इंडिज टीमचा मी कॅप्टन झालो, हे माझं सौभाग्य आहे. माझं बालपणीच स्वप्न पूर्ण झाल्याच त्याने सांगितलं.
?BREAKING NEWS?
CWI announces new captains for White-Ball formats.
Read More⬇️ https://t.co/Bmw7qILA9p pic.twitter.com/suNk7ndqKE
— Windies Cricket (@windiescricket) February 15, 2023
पॉवेलकडे T20 मध्ये कॅप्टनशिपचा अनुभव
रोव्हमॅन पॉवेलकडेही T20 मध्ये कॅप्टनशिपचा अनुभव आहे. त्याने CPL मध्ये जमैका थलायवाच नेतृत्व केलय. मागच्यावर्षी टीमला किताब जिंकून दिला. त्याशिवाय त्याने जमैकाच नेतृत्व सुद्धा केलय.
दक्षिण आफ्रिका टूरपासून सुरु होणार प्रयोग
वेस्ट इंडिजचा दक्षिण आफ्रिका दौरा 28 फेब्रुवारीपासून सुरु होतोय. 28 मार्च पर्यंत हा टूर असेल. यात 2 टेस्ट, 3 वनडे आणि तितकेच टी 20 सामने वेस्ट इंडिजची टीम खेळणार आहे. क्रिकेटच्या तीन वेगवेगळ्या फॉर्मेटमध्ये वेस्ट इंडिजकडून 3 जण नेतृत्व करताना दिसतील. या दौऱ्याची सुरुवात टेस्ट सीरीजने होईल. त्यानंतर वनडे आणि अखेरीस टी 20 सीरीज होईल. तिन्ही फॉर्मेटमध्ये वेगवेगळ्या कॅप्टन्सचा प्रयोग किती यशस्वी ठरतो, ते लवकरच दिसेल.