मुंबई: वेस्ट इंडिजच्या (West indies) क्रिकेट संघातील स्फोटक फलंदाज आंद्रे रसेलच्या (Andre Russell) खेळाची सर्वांनाच कल्पना आहे. हा कॅरेबियन स्टार काहीवेळ जरी खेळपट्टीवर टिकला, तरी प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांची खैर नसते. वेस्ट इंडिज मधील सिक्सटी (6ixty) स्पर्धेत हे दृश्य पहायला मिळालं. बस्सेटेर ट्रिनबॅगो नाइट रायडर्ससाठी खेळताना रसेलने अवघ्या 24 चेंडूत 72 धावा चोपल्या. या सामन्याचं वैशिष्ट्य म्हणजे रसेलने सेंटर किट्स अँड नेविस पॅट्रियट्स संघाविरुद्ध सहा षटकार लगावले. आंद्रे रसेलच्या मैदानातील आतषबाजीने सामना पहायला स्टेडियम मध्ये आलेल्या प्रेक्षकांचा पैसा वसूल झाला. आंद्र रसेलने त्याच्या खेळीत पाच चौकार आणि आठ षटकार ठोकले.
आंद्र रसेलचा हा आक्रमक अवतार 7 व्या ओव्हर मध्ये पहायला मिळाला. डॉमिनिक ड्रेक सेंट किट्ससाठी सातवी ओव्हर टाकत होता. रसेलने ड्रेकच्या या ओव्हर मधील तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर षटकार ठोकला. त्यानंतर आठवी ओव्हर टाकणाऱ्या जॉन रस जग्गेजारच्या पहिल्या दोन चेंडूवर षटकार ठोकले. क्रिकेटच्या इतिहासात सहा चेंडूत सहा षटकार ठोकणाऱ्या निवडक खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश झाला आहे.
ट्रिनबॅगो नाइट रायडर्सचा संघ या सामन्यात टॉस हरला. प्रथम फलंदाजी करताना त्यांनी सेंटर किट्स अँड नेविस पॅट्रियट्स संघासमोर विजयासाठी 156 धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना सेंट किट्सच्या संघाने निर्धारीत षटकात चार विकेट गमावून 152 धावा केल्या. खालच्या क्रमाकांवर फलंदाजीला आलेल्या शेरफेन रुदरफोर्डने 15 चेंडूत 50 धावांची स्फोटक खेळी केली. पण या इनिंगने तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
Andre Russell SIX SIXES off consecutive SIX balls in the SIXTY tournament.
8 SIXES and 5 FOURS.@TKRiders pic.twitter.com/jBKyzqwPOj
— ??????⎊ (@StarkAditya_) August 28, 2022
ट्रिनबॅगो नाइट रायडर्ससाठी या सामन्यात अँडरसन फिलिपने चांगली गोलंदाजी केली. त्याने 2 षटकात 17 धावा देऊन तीन विकेट घेतल्या. फिलिपने आंद्रे फ्लेचर (33), एविन लुईस (7) आणि डोवाल्ड ब्रेविस (0) या तिघांना आऊट केलं.