नवी दिल्ली : क्रिकेटमध्ये काही असे प्लेयर आहेत, ज्यांना ठराविक टीम विरुद्ध खेळायला विशेष आवडतं. भारताच्या वीवीएस लक्ष्मणला ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळायला विशेष आवडायचं. ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना त्याचा खेळ बहरुन यायचा. क्रिकेट विश्वात असाही एक खेळाडू होता, ज्याला टीम इंडिया विरुद्ध धावा करणं विशेष पसंत होतं. वेस्ट इंडिजचा माजी कॅप्टन आणि महान फलंदाज शिवनारायण चंद्रपॉल. वेस्ट इंडिजकडून खेळणाऱ्या भारतीय वंशाच्या चंद्रपॉलने टीम इंडियाला नेहमीच सतावलं.
आधी चंद्रपॉल जे काम करायचा, तेच काम करण्यासाठी आता त्याचा मुलगा तयार आहे. शिवनारायणच्या मुलाच नाव आहे, तेजनारायण. टीम इंडिया जुलै महिन्यात वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया दोन टेस्ट मॅच खेळणार आहे. या मालिकेच्या तयारीसाठी वेस्ट इंडिजने 18 खेळाडूंची निवड केली आहे. यात तेजनारायण सुद्धा आहे.
त्याने वेस्ट इंडिजसाठी डेब्यु केलाय
तेजनारायण आपल्या वडिलांच्या मार्गावर चालण्यासाठी तयार आहे. त्याने वेस्ट इंडिजसाठी टेस्ट डेब्यु केला आहे. तेजनारायण वेस्ट इंडिजसाठी आतापर्यंत 5 कसोटी सामने खेळलाय. यात त्याने 45.30 च्या सरासरीने 453 धावा केल्या आहेत. त्याने एक सेंच्युरी आणि एक हाफ सेंच्युरी झळकवली आहे.
डबल सेंच्युरी
30 नोव्हेंबर 2022 मध्ये तेजनारायण पर्थवर पहिला कसोटी सामना खेळला. पहिल्या इनिंगमध्ये 51 धावा केल्या. दुसऱ्या इनिंगमध्ये 47 रन्स केल्या. त्यानंतर यावर्षी फेब्रुवारी महिन्यात झिम्बाब्वे विरुद्ध तो दुसरा कसोटी सामना खेळला. या टेस्ट मॅचमध्ये तेजनारायण 207 धावांची इनिंग खेळला. त्यानंतरच्या तीन कसोटी सामन्यात तो मोठी इनिंग खेळू शकला नाही.
Like Father Like Son ?
A maiden double Test ton for Tagenarine Chanderpaul.#ZIMvWI #WIvZIM pic.twitter.com/m7LXRSwgxm
— Cricket Videos ? (@Abdullah__Neaz) February 6, 2023
टीममध्ये निवड पक्की
तेजनारायणने जे प्रदर्शन केलय, त्यावरुन त्याचं टीम इंडिया विरुद्धच्या सीरीजसाठी सिलेक्शन पक्क समजल जातय. त्याला प्लेइंग 11 मध्ये सुद्धा संधी मिळेल. तो आपल्या वडिलांप्रमाणे बॅटिंग करतो. टीमचा भार आपल्यावर घेतो. तेजनारायणच्या फलंदाजीत वडिलांची छाप दिसून येते. आता भारतीय क्रिकेट चाहत्यांची एकच इच्छा असेल, शिवनारायण चंद्रपॉलने जसं हैराण केलं, तस त्याच्या मुलाने करु नये.
वडिलांची टीम इंडिया विरुद्ध इतकी दमदार कामगिरी
शिवनारायण चंद्रपॉल भारताविरुद्ध 25 कसोटी सामने खेळलाय. त्याने 63.85 च्या सरासरीने 2171 धावा केल्या आहेत. भारताविरुद्ध त्याने सात सेंच्युरी आणि 10 हाफ सेंच्युरी झळकवल्या आहेत. वनडेमध्ये सुद्धा शिवनारायण चंद्रपॉलची भारताविरुद्ध चांगली कामगिरी आहे. त्याने 46 सामन्यात 35.64 च्या सरासरीने 1319 धावा केल्या आहेत. यात दोन सेंच्युरी आणि 10 हाफ सेंच्युरी आहेत.