मुंबई: वेस्ट इंडिजचा (West Indies) अव्वल फलंदाज कायरन पोलार्डने (kieron pollard) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (International cricket) निवृत्ती जाहीर केली आहे. पोलार्ड वेस्ट इंडिजच्या मर्यादीत षटकांच्या क्रिकेट संघाच कर्णधार होता. कायरन पोलार्ड सध्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून खेळतोय. सोशल मीडियावरुन पोलार्डने 15 वर्षाचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट करीयर समाप्तीची घोषणा केली आहे. वेस्ट इंडिजच्या वनडे आणि टी 20 टीमचा कॅप्टन कायरन पोलार्डने आज स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट करुन निवृत्तीची घोषणा केली. कायरन पोलार्डने 2007 मध्ये वेस्ट इंडिजसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता. तो सर्व फॉर्मेटमध्ये एकूण 224 सामने खेळला आहे. त्याने चार हजार पेक्षा जास्त धावा आणि 97 विकेट काढल्या आहेत.
“विविध सिलेक्टर्स, मॅनेजमेंट आणि खासकरुन कोच फिल सिमन्स यांचे मी आभार मानतो. त्यांनी माझी क्षमता पाहिली व माझ्यावर विश्वास दाखवला. क्रिकेट वेस्ट इंडिजने माझ्यावर जो विश्वास दाखवला. त्यामुळे मी संघाचे नेतृत्व करु शकलो. क्रिकेट वेस्ट इंडिजच्या प्रमुखांचे मी आभार मानतो. कर्णधारपदावर असताना त्यांनी जो पाठिंबा दिला, विश्वास दाखवला त्या बद्दल मी क्रिकेट वेस्ट इंडिजचे प्रमुख रिकी यांचे आभार मानतो” असं पोलार्डने त्याच्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे.
“खूप विचारपूर्वक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती होण्याचा आज मी निर्णय घेतला आहे” असं पोलार्डने त्याच्या इन्स्टाग्राम व्हिडिओत म्हटलं आहे. “अन्य तरुण मुलांप्रमाणे माझी सुद्धा वयाच्या 10 व्या वर्षापासूनच वेस्ट इंडिजसाठी खेळण्याची इच्छा होती. आज मला अभिमान आहे, टी 20 आणि वनडे या दोन्ही फॉर्मेटमध्ये मी 15 वर्ष वेस्ट इंडिजचं प्रतिनिधीत्व केलं” असं पोलार्डने सांगितलं.
You will never have a better Mastercard Priceless Moment than this one! ?? @KieronPollard55 became the 1st West Indian to hit 6 sixes in a T20I over!#WIvSL #MastercardPricelessMoment #MenInMaroon pic.twitter.com/YOGItXOY8H
— Windies Cricket (@windiescricket) March 4, 2021
2007 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्यातून पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू केला. 20 फेब्रुवारीला भारताविरुद्ध कोलकाता येथे तो शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. श्रीलंकेविरुद्धच्या टी 20 सामन्यात कायरन पोलार्डने एका ओव्हरमध्ये सहा सिक्स मारले होते. अशी कामगिरी करणारा तो वेस्ट इंडिजचा तिसरा क्रिकेटपटू आहे. पोलार्ड वेस्ट इंडिजसाठी 123 वनडे आणि 101 टी 20 सामने खेळला. पोलार्ड वेस्ट इंडिजसाठी कधीही कसोटी सामना खेळला नाही. वनडे आणि टी 20 खेळाडू म्हणूनच पोलार्डकडे पाहिलं गेलं.
वनडे आणि टी 20 अशा दोन्ही फॉर्मेटमध्ये पोलार्डने 61 सामन्यात वेस्ट इंडिजचं नेतत्व केलं. त्यात 25 सामने विंडिजने जिंकले तर 31 सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला.