What A Catch! प्रभसिमरन सिंगची विकेटसाठी बदोनी आणि रवि बिश्नोईने केली मेहनत, असा पकडला झेल Video

| Updated on: Apr 01, 2025 | 10:28 PM

आयपीएल 2025 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स हे दोन संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकात 7 गडी गमवून 171 धावा केल्या आणि विजयासाठी 172 धावांचं आव्हान दिलं. या सामन्यात प्रभसिमरन सिंगने जबरदस्त खेळी केली. 34 चेंडूत 69 धावा करून बाद झाला.

What A Catch! प्रभसिमरन सिंगची विकेटसाठी बदोनी आणि रवि बिश्नोईने केली मेहनत, असा पकडला झेल Video
Image Credit source: video grab
Follow us on

आयपीएल 2025 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सने पंजाब किंग्ससमोर विजयासाठी 172 धावांचं आव्हान दिलं आहे. हे आव्हान गाठण्यासाठी प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग ही जोडी मैदानात आली होती. पण 8 धावांवर दिग्वेश राठीने प्रियांशची विकेट काढली. त्यानंतर प्रभसिमरन आणि श्रेयस अय्यरने जबरदस्त केली आहे. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 84 धावांची खेळी केली. या भागीदारीमुळे विजयाचं अंतर कमी झालं. प्रभसिमरन सिंगने यावेळी 202 च्या स्ट्राईक रेटचने 34 चेंडूत 69 धावा केल्या. या खेळीत त्याने 9 चौकार आणि तीन षटकार मारले. त्याचा आक्रमक अंदाज पाहून लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांना घाम फुटला होता. कारण समोर कोणत्याही गोलंदाज आला तरी प्रभसिमरन सिंग काय कोणाला ऐकत नव्हता. पंजाब किंग्सच्या 10 षटकात 1 गडी बाद 110 धावा झाल्या होत्या. 11 व्या षटक टाकण्यासाठी कर्णधार पंतने दिग्वेश राठीला बोलवलं आणि पहिल्याच चेंडूवर कमाल झाली.

प्रेशर कमी झाल्यानंतर दिग्वेश राठीच्या पहिल्याच चेंडूवर प्रभसिमरन सिंगने उत्तुंग फटका मारला. चेंडू खूपच वर चढला होता. आरामात षटकार जाईल असं वाटत होतं. पण तसंच झालं नाही आयुष बदोनी त्या चेंडूच्या खाली आला. चेंडू हातात आला पण तोल जातोय असं दिसताच त्याने सीमेच्या आत चेंडू फेकला. रवि बिष्णोई त्याच्याकडे नजर ठेवून होता. त्याने चेंडू फेकल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता उडी घेतली आणि प्रभसिमरन सिंगचा झेल पकडला. हा झेल इतका जबरदस्त होता की सोशल मीडियावर या झेलचं कौतुक होत आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, ग्लेन मॅक्सवेल, सूर्यांश शेडगे, मार्को जॅनसेन, लॉकी फर्ग्युसन, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग.