मोहम्मद शमी आणि सिराजमध्ये कोण? ह्दयावर दगड ठेवून रोहित घेणार मोठा निर्णय

| Updated on: Oct 27, 2023 | 10:41 AM

World cup 2023 | वर्ल्ड कप 2023 सुरु होण्याआधीपासून टीम इंडियासमोर हा प्रश्न होता. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकुरपैकी कोण दोन गोलंदाज जसप्रीत बुमराहला साथ देणार?. वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडियाने आतापर्यंत जबरदस्त प्रदर्शन केलय. सुरुवातीचे पाचही सामने जिंकले आहेत. फक्त आता हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे टीम इंडियासमोर काही प्रश्न निर्माण झालेत.

मोहम्मद शमी आणि सिराजमध्ये कोण? ह्दयावर दगड ठेवून रोहित घेणार मोठा निर्णय
mohammed shami-mohammed siraj
Follow us on

लखनऊ : सहा दिवसाच्या मोठ्या ब्रेकनंतर टीम इंडिया वनडे वर्ल्ड कप 2023 मधील आपला पुढचा सामना खेळणार आहे. टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन काय असेल? यावर सगळ्यांची नजर असेल. 22 ऑक्टोबरला धर्मशाळा येथे न्यूझीलंड विरुद्ध सामना झाला. या मॅचमध्ये टीम इंडिया आपला स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याशिवाय उतरली होती. 29 ऑक्टोबरला लखनऊ येथे इंग्लंड विरुद्ध सामना होणार आहे. त्यावेळी सुद्धा टीम हार्दिक पांड्याशिवाय खेळणार आहे. इंग्लंड विरुद्ध प्लेइंग इलेव्हन निवडताना टीम इंडियाची थोडी अडचण असेल. लखनऊमधील सामन्यात कॅप्टन रोहित शर्मा आणि हेड कोच राहुल द्रविड यांच्यासाठी एक निर्णय आव्हानात्मक असेल. मोहम्मद शमी कि, मोहम्मद सिराज?.

वर्ल्ड कप सुरु होण्याआधीपासून ही चर्चा सुरु होती. जसप्रीत बुमराहसोबत दुसरा आणि तिसरा पेसर कोण असेल?. सिराज, शमी आणि शार्दुल ठाकूरमध्ये स्पर्धा होती. सुरुवातीच्या चार सामन्यात सिराज आणि शार्दुलला संधी मिळाली. त्यांचा हा पहिलाच वर्ल्ड कप आहे. सलग 2 वर्ल्ड कपमधील भारताचा यशस्वी गोलंदाज मोहम्मद शमीला बेंचवर बसून वाट पहावी लागली. हार्दिकला दुखापत झाल्यानंतर शार्दुलच्या जागी शमीला निवडण्यात आलं. न्यूझीलंड विरुद्ध पहिल्याच सामन्यात शमीने कमाल केली. त्याने 5 विकेट काढले. या प्रदर्शनामुळे पुढच्या सामन्यात कोण खेळणार? शमी कि, सिराज हा प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे.

वर्ल्ड कपमध्ये या पीचचा रेकॉर्ड काय?

पुढचा सामना लखनऊच्या एकाना स्टेडियमवर होणार आहे. लखनऊची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना अनुकूल मानली जाते. IPL 2023 मध्ये लखनऊची विकेट स्लो होती. वर्ल्ड कपसाठी नवीन पीच बनवण्यात आलय. इथे वर्ल्ड कपचे 3 सामने झालेत. त्यात वेगवान गोलंदाजांनी 27 विकेट काढल्यात. 15 विकेट फिरकी गोलंदाजांनी काढल्यात. ही विकेट वेगवान गोलंदाजांना अनुकूल आहे. त्यामुळे सिराज आणि शमी दोघांना या विकेटवर खेळवाव लागेल.

ह्दयावर दगड ठेवून रोहित काय निर्णय घेईल?

शमी आणि सिराज दोघांपैकी एकाला बाहेर बसवाव लागलं, तर कॅप्टन रोहित कोणाच बलिदान देईल?. सिराजने या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे प्रदर्शन केलेलं नाहीय. प्रत्येक सामन्यात पावरप्लेमध्ये तो धावा लुटवतोय. विकेटही घेत नाहीय. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात सिराजला त्याची लय सापडली होती. पण शमीने या सामन्यात जे प्रदर्शन केलं, ते पाहात त्याला दुसऱ्या सामन्यात संधी देणं चुकीच ठरणार नाही. मोहम्मद शमी स्लो विकेटकवर प्रभावी ठरतो. दोघांपैकी कोणाला एकाला बाहेर बसवण्याचा निर्णय रोहितला घ्यावा लागला, तर ह्दयावर दगड ठेवून सिराजला बाहेर बसवाव लागेल.