सिडनी : आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये 37 वा सामना झाला. या मॅचमध्ये चेन्नईचा 32 धावांनी पराभव झाला. या पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्सचे फॅन्स निराश होणं स्वाभाविक आहे. कारण टीम पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या नंबरवर गेली. चेन्नईच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज शॉन टेटने एक मोठी गोष्ट बोलला. चेन्नईची टीम मॅच हरली, पण धोनीने बॅटिंग केली नाही.
“चेन्नई सुपरकिंग्सला जेव्हा फोर-सिक्सची गरज होती, तेव्हा धोनी बाऊंड्री लाइनवर बसून होता” असं शॉन टेट ईएसपीएन क्रिकइन्फोवरील चर्चेत म्हणाला. मला हे दृश्य पहावल नाही. कुठला खेळाडू आऊट होईल का? असा विचार मनात येत होता” असं शॉन टेटने सांगितलं.
त्या मॅचमध्ये काय झालं?
राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात धोनीने वरती फलंदाजीसाठी यायला पाहिजे होतं, असं शॉन टेटने सांगितलं. चेन्नई सुपर किंग्सची मंदगतीने सुरुवात झाली होती. राजस्थानने पहिल्या 10 ओव्हरमध्येच सामना आपल्या बाजूने फिरवला होता. अशावेळी धोनी वरती फलंदाजी करण्यासाठी आला असता, तर वेगळी गोष्ट होती. धोनीची बॅट चालतेय. तो लांब लचक सिक्स मारण्यासाठी ओळखला जातो. धोनी डगआऊटमध्ये बसून राहिला आणि चेन्नईची टीम 32 रन्सनी मॅच हरली.
धोनीच्या चेन्नईच काहीच चाललं नाही
राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सला पुन्हा एकदा हरवलं. या सीजनच्या पहिल्या मॅचमध्ये राजस्थानने चेन्नईला 3 रन्सनी हरवलं होतं. यावेळी 32 धावांनी पराभूत केलं. राजस्थानच्या विजयात यशस्वी जैस्वालची बॅट तळपली. यशस्वीने 43 चेंडूत 77 धावा चोपल्या. ध्रुव जुरेलने 15 चेंडूत 34 धावा तडकावल्या. देवदत्त पडिक्कलने 13 चेंडूत नाबाद 27 धावा फटकावल्या.
राजस्थान रॉयल्सच्या स्पिनर्सनी चेन्नई सुपरकिंग्सला कुठलीही संधी दिली नाही. एडम जंपाने 3 ओव्हरमध्ये 22 धावा देऊन 3 विकेट काढल्या. अश्विनने 35 रन्स देऊन 2 विकेट काढल्या. वेगवान गोलंदाज कुलदीप यादवने 3 ओव्हरमध्ये 18 धावा देऊन एक विकेट काढला.