Virat vs Gambhir IPL 2023 : विराट कोहली आणि गौतम गंभीरमधील मैत्री दुश्मनीमध्ये कधी बदलली? नेमकं काय झालेलं?

| Updated on: May 02, 2023 | 1:48 PM

Virat vs Gambhir IPL 2023 : दोघे दिल्लीचेच पण मैत्री शत्रुत्वामध्ये बदलायला एक प्रसंग कारणीभूत आहे. दोघे एकत्र टीम इंडियातून खेळले आहेत. मग दोघांमध्ये बिनसलं कशावरुन? मैत्री दुश्मनीमध्ये कशी बदलली?

Virat vs Gambhir IPL 2023 : विराट कोहली आणि गौतम गंभीरमधील मैत्री दुश्मनीमध्ये कधी बदलली? नेमकं काय झालेलं?
ipl 2023 virat kohli-Gautam Gambhir
Image Credit source: twitter
Follow us on

लखनौ : टीम इंडियाचा प्रमुख खेळाडू विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये काल मोठा वाद झाला. दोघांमधील जाहीर भांडणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये काल लखनौमध्ये सामना झाला. ही मॅच संपल्यानंतर सर्व वाद उफाळून आला. या भांडणाची स्क्रिप्ट आधीच सामना सुरु असताना लिहिली गेली होती. त्यावेळी विराट कोहली आणि लखनौच्या खेळाडूंमध्ये मैदानावर वादावादीचे प्रसंग घडले होते.

यंदाच्या सीजनमध्ये लखनौ आणि बँगलोरच्या टीममध्ये झालेला पहिला सामना लखनौने जिंकला होता. त्यावेळी लखनौचा मार्गदर्शक गौतम गंभीरने मैदानात येऊन चूप रहाण्याचा इशारा करुन बँगलोरच्या फॅन्सना डिवचलं होतं.

दोघे पण दिल्लीचेच आहेत

त्यामुळे सीजनमधील दुसरा सामना खेळताना, दोन्ही टीम्समधील वातारवण चार्ज असणं स्वाभाविक होतं. त्याचे पडसाद सुद्धा कालच्या सामन्यात पहायला मिळाले. खरंतर वाद घालणारे विराट कोहली आणि गौतम गंभीर दोघे दिल्लीचे आहेत. एका राज्याच्या टीममधून खेळलेल्या प्लेयर्समध्ये चांगली मैत्रीची भावना असते. महत्वाचं म्हणजे दोघे एकत्र टीम इंडियातून खेळले आहेत. मग दोघांमध्ये बिनसलं कशावरुन? मैत्री दुश्मनीमध्ये कशी बदलली? असा प्रश्न कोणाच्याही मनात निर्माण होणं स्वाभाविक आहे.

त्यावेळी दोघे चांगले मित्र होते

कोलकात्यात 2009 साली श्रीलंकेविरुद्ध विराट कोहलीने (107) शतकी खेळी साकारली. ते विराटच वनडेमधील पहिलं शतक होतं. त्या मॅचमध्ये गौतम गंभीरने नाबाद 150 धावा केल्या होत्या. गौतम गंभीरला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालेला. त्यावेळी विराट आणि गौतम गंभीर परस्परांचे चांगले मित्र होते. दोघांच्या मनात परस्परांबद्दल सन्मान होता.


तेव्हा, संबंध बिघडले ते कायमचेच

पण IPL 2013 मध्ये एका मॅचनंतर हे सर्वकाही संपलं. त्यावेळी कालच्या सारख्याच हजारो लोकांसमोर हे खेळा़डू परस्परांशी भिडले होते. विराट कोहली त्या मॅचमध्ये आऊट झाल्यानंतर शिवी देत चालला होता. गंभीरने त्यावेळी विराटला, शिवी का दिली? या बद्दल प्रश्न विचारला. त्यावेळी सर्व काही कॅमेऱ्यात कैद झालं. या घटनेनंतर दोन्ही खेळाडूंमधील संबंध बिघडले ते कायमचेच. आता वेळोवेळी मनातील ती शत्रुत्वाची भावना दिसून येते.

गौतम गंभीर अनेकदा कार्यक्रमामध्ये बोलताना विराट कोहलीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. विराटवर टीका करताना दिसतो. काल झालेल्या वादावादीला या सगळ्यीच सुद्धा किनार आहे.