नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीमचा वेस्ट इंडिज दौरा 12 जुलैपासून सुरु होणार आहे. दोन टेस्ट मॅचने सीरीजची सुरुवात होणार आहे. डॉमिनिकामध्ये पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. टीम इंडिया बारबाडोसमध्ये सराव केल्यानंतर आता डॉमिनिकामध्ये पोहोचली आहे. पहिल्या मॅचची तयारी त्यांनी सुरु केलीय. याच सीरीजपासून टीम इंडिया आपल्या तिसऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अभियानाची सुरुवात करणार आहे. पहिल्या कसोटीसाठी प्लेइंग-11 मध्ये कुठल्या वेगवान गोलंदाजांना संधी द्यायची? हा कॅप्टन रोहित शर्मा आणि हेड कोच राहुल द्रविड यांच्यासमोरचा प्रश्न असणार आहे.
भारताच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणाबद्दल बोलायच झाल्यास सर्वप्रथम जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीच नाव येतं. दोघांनी बऱ्याच वर्षांपासून वेगवान गोलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर संभाळली आहे. सध्या बुमराह दुखापतीमधून सावरतोय आणि शमीला विडिंज दौऱ्यासाठी आराम दिलाय. आता टीम इंडिया कुठल्या वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरणार हा प्रश्न आहे.
सिराजच्या जोडीला अन्य दोन कोण?
बुमराह आणि शमी शिवाय उमेश यादव टीम इंडियाचा महत्वाचा वेगवान गोलंदाज आहे. पण या सीरीजसाठी तो टीममध्ये नाहीय. युवा गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या गोलंदाजीने प्रभावित केलय. ऑस्ट्रेलियापासून इंग्लंडपर्यंत सिराजने आपली छाप उमटवली आहे. सिराजच टीममध्ये खेळणं निश्चित आहे. पण सिराजशिवाय कोण? हा खरा प्रश्न आहे. टीम मॅनेजमेंटला कमीत कमी तीन वेगवान गोलंदाज निवडावे लागतील. यात सिराजच नाव निश्चित आहे, पण अन्य दोन कोण?
India’s warm up match.
Video Courtesy: Instagram/cricbarbados#IndianCricketTeam pic.twitter.com/ZawSnvYsqt
— Aniket (@anikkkett) July 5, 2023
चौघांसाठी मोठी संधी
सिलेक्टर्सनी या दौऱ्यासाठी निवडलेल्या टीममध्ये एकूण पाच वेगवान गोलंदाज आहेत. टीममध्ये डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी आणि मुकेश कुमार आहेत. अन्य दोन स्थानांसाठी या चार गोलंदाजांमध्ये स्पर्धा असेल.
सिराजसोबत याला संधी मिळेल
सिराजसोबत शार्दुल ठाकूरला सातत्याने संधी मिळाली आहे. शार्दुलला WTC फायनलमध्ये संधी मिळाली होती. ठाकूर वेळेला विकेट काढून देण्यासाठी ओळखला जातो. त्याशिवाय फलंदाजी सुद्धा करु शकतो. WTC फायनलच्या पहिल्या इनिंगमध्ये शार्दुलने 51 धावा केल्या होत्या. त्यामुळे सिराजसोबत तो दुसरा वेगवान गोलंदाज असू शकतो. जयदेव उनाडकट आणि मुकेश कुमारमध्ये जयदेवला संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. कारण त्याच्याकडे अनुभव आहे.