मुंबई: IPL च्या 15 व्या सीजनसाठी आज लिलाव सुरु असताना एक दुर्देवी घटना घडली. लिलावाची जबाबादरी संभाळणारे, बोली पुकारणारे ह्यू एडमीड्स (Hugh Edmeades) अचानक चक्कर येऊन कोसळले. श्रीलंकेचा ऑलराऊंडर वानिन्दु हसारंगावर बोलीची प्रक्रिया सुरु असताना ही घटना घडली. बंगळुरुमध्ये हा लिलाव सुरु आहे. तूर्तास लिलाव प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. ह्यू एडमीड्स हे मूळचे ब्रिटीश ऑक्शनर (British Auctioner) आहेत. त्यांच वय 63 आहे. वानिन्दु हसारंगावर 10.75 कोटीची बोली लागलेली असताना ही घटना घडली.
ह्यू एडमीड्स हे ब्रिटिश फाइन आर्ट, क्लासिक कार आणि चॅरिटी ऑक्शनसाठी ओळखले जातात. 35 वर्षाच्या करीयरमध्ये त्यांनी 2,500 पेक्षा जास्त ऑक्शन्स केले आहेत. चित्र, पेंटिंग्स, चित्रपट आणि खेळाशी संबंधित वस्तुंचा लिलाव करण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे.
ह्यू एडमीड्स यांनी ब्रिटिश ऑक्शन हाऊसमध्ये काम केलं आहे. त्यांनी तीन लाखापेक्षा जास्त वस्तुंवर बोली लावली आहे. लंडनमध्ये झालेल्या नेल्सन मंडेला गाला ऑक्शनमध्येही ते होते.