MI vs RCB IPL 2023 : मुंबई इंडियन्स आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम आहे. या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सला विजयी सुरुवात करता आली नाही. पहिल्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने मुंबई इंडियन्सचा 8 विकेटने पराभव केला. मुंबईने मॅच गमावली. पण नेहल वाधेरा एक सिक्स मारुन रातोरात स्टार बनला. हा नुसता सिक्स नव्हता, तर लक्षात राहण्यासारखा सिक्स होता. मुंबईने 48 धावांवर 4 विकेट गमावल्या होत्या. त्यावेळी नेहल क्रीजवर आला. त्यावेळी तिलक वर्मा आणि डेब्यु करणाऱ्या नेहलने मोठी भागीदारी करण्याचा प्रयत्न केला.
तिलक 84 रन्सवर नाबाद राहिला. नेहलने 13 चेंडूत 21 धावा फटकावल्या. तिलक आणि नेहलच्या तुफानी बॅटिंगच्या बळावर मुंबईने 7 विकेट गमावून 171 धावा केल्या. RCB ने हे लक्ष्य 16.2 ओव्हर्समध्ये गाठलं. नेहलची इनिंग छोटी होती. पण पदार्पणातच त्याने लक्ष वेधून घेतलं.
101 मीटर लांब सिक्स
नेहलने आपल्या आक्रमक खेळीत एक चौकार आणि दोन षटकार मारले. त्याने कर्ण शर्माच्या गोलंदाजीवर एक असा सिक्स मारला, ज्याने पाहणारे थक्क झाले. 14 वी ओव्हर सुरु होती. कर्णच्या ओव्हरमध्ये चौथ्या चेंडूवर नेहलने लॉन्ग ऑनच्या वरुन 101 मीटर लांब सिक्स मारला. नेहलने चेंडूला थेट स्टेडियमच्या छपरावर पोहोचवलं. यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये 100 मीटर लांब सिक्स मारणारा नेहल पहिला भारतीय बनलाय.
The massive 101M six by the debutant, Nehal Wadhera.
The first Indian to smash a 100M six in IPL 2023. pic.twitter.com/jAGHyQDu00
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 2, 2023
ऑक्शननंतर सीनियर लेव्हलला डेब्यु
22 वर्षाच्या नेहलला मुंबई इंडियन्सने ऑक्शनमध्ये 20 लाख रुपयांच्या बेस प्राइसला विकत घेतलय. वैशिष्ट्य म्हणजे मुंबईने नेहलला विकत घेतलं, तेव्हा त्याने एकही टी 20 सामना खेळला नव्हता. त्याने सीनियर लेव्हलला सुद्धा एकही मॅच खेळली नव्हती. मुंबईने विकत घेतल्यानंतर त्याने यावर्षी जानेवारी महिन्यात रणजीमध्ये डेब्यु केला. आरसीबी विरुद्ध त्याचा हा फक्त पहिला आयपीएल सामना नाही, तर करियरलमधला पहिला टी 20 सामना होता.
एका इनिंगमध्ये 79 फोर-सिक्स
नेहलची क्षमता आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात दिसून आली. पण हे फार कमी जणांना माहितीय, तो मोठ्या इनिंगही खेळू शकतो. वर्षभरापूर्वी पंजाबच्या अंडर 23 इंटर डिस्ट्रिक टूर्नामेंटमध्ये भटिंडा विरुद्ध एका इनिंगमध्ये 578 धावा ठोकल्या होत्या. लुधियानाकडून खेळताना त्याने 42 फोर आणि 37 सिक्स मारले होते.