Virat kohli Fight IPL 2023 : विराट कोहलीला भिडणारा Naveen Ul Haq कोण आहे?

| Updated on: May 02, 2023 | 10:45 AM

Virat kohli Fight IPL 2023 : विराट कोहलीने Naveen Ul Haq ला दाखवला बटू. नवीन उल हकने आयपीएलमध्ये कधी डेब्य केला? तो कुठल्या देशाकडून खेळतो? जाणून घ्या सर्वकाही.

Virat kohli Fight IPL 2023 : विराट कोहलीला भिडणारा Naveen Ul Haq कोण आहे?
Virat kohli-Naveen ul haq
Image Credit source: twitter
Follow us on

लखनौ : इंडियन प्रीमियर लीगमध्ये काल लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये सामना झाला. ही मॅच कोण जिंकलं? कोण हरलं? यापेक्षा वादावादीमुळे जास्त चर्चेत आहे. सोशल मीडियावर कोण चूक-कोण बरोबर याची चर्चा रंगली आहे. कोण विराट कोहलीची चूक सांगतोय. कोण गौतम गंभीरला चुकीच ठरवतोय. या मॅचमध्ये लखनौ सुपर जायंट्सची बॅटिंग सुरु झाल्यानंतर वाद सुरु झाला.

इनिंगच्या 17 व्या ओव्हरमध्ये अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक आणि विराट कोहलीमध्ये बाचाबाची झाली. अमित मिश्रा मध्ये पडला. अखेर अंपायर्सना विषय शांत करावा लागला.

विराटने काय केलं?

विराट कोहलीची मैदानावरी अंपायर्स बरोबर दीर्घ चर्चा झाली. विराट कोहली काहीतरी, बोलला, त्यावर नवीन उल हकने उत्तर दिलं. कोहलीने पुन्हा पलटवार केला. नवीनकडे इशारा करण्याआधी विराटने त्याला आपला बूट दाखवला. मैदानावरील हा वाद आणखी वाढला.

काइल मेयर्सला खेचून नेलं

मॅच संपल्यानंतर विराट कोहली आणि लखनौ सुपर जायंट्सचा सलामीवीर काइल मेयर्स चर्चा करत होते. त्यावेळी गौतम गंभीर मैदानात आला. तो काइल मेयर्सला खेचून कोहलीपासून लांब घेऊन गेला. त्यानंतर कोहली आणि गंभीर आपसात भिडले. या प्रकरणात नवीन-उल-हक सुद्धा आहे. कोण आहे तो? जाणून घेऊया.


कोण आहे नवीन-उल-हक?

रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध 13 चेंडूत 13 धावा करणारा नवीन उल हक अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज आहे. त्याने वर्ल्ड कप 2022 आणि आशिया कप 2022 मध्ये शानदार प्रदर्शन केलय. नवीन जगभरातील टी 20 लीगमध्ये खेळतो.
आतापर्यंत तो, सिलहट थंडर्स, गुयाना अमेजन वॉरियर्स, टीम अबू धाबी, खुलना टायगर्स, कोलंबो स्टार्स, शारजाह वॉरियर्स, सिडनी सिक्सर्स, क्वेटा ग्लेडिएटर्स या टी 20 लीगमध्ये खेळतोय.

नवीनने आयपीएलमध्ये डेब्यु कधी केला?

23 सप्टेंबर 1999 रोजी नवीन उल हकचा जन्म झाला. 2016 मध्ये त्याने बांग्लादेश विरुद्ध डेब्यु केला. 2019 मध्ये टी 20 क्रिकेटमध्ये डेब्यु केला. 19 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्सकडून आयपीएलमध्ये डेब्युची संधी मिळाली. तो अफगाणिस्तानसाठी 7 वनडे आणि 27 टी 20 सामने खेळलाय.