Nehal Wadhera IPL 2023 : गुरु सारखाच चेला, सूर्यकुमार यादवचा ‘चेला’, कोण आहे नेहल वढेरा?

| Updated on: May 10, 2023 | 1:26 PM

Nehal Wadhera IPL 2023 : कोट्यवधी रुपयाच्या खेळाडूंवर एकटा भारी पडलेला नेहल वढेरा कोण? सूर्यकुमार यादवच्या हाफ सेंच्युरीने प्रतिस्पर्धी टीमची वाट लागली, तर नेहल वढेराच्या हाफ सेंच्युरीने टीमला लक्ष्यापर्यंत पोहोचवलं.

Nehal Wadhera IPL 2023 : गुरु सारखाच चेला, सूर्यकुमार यादवचा चेला, कोण आहे नेहल वढेरा?
nehal wadhera
Image Credit source: social media
Follow us on

मुंबई : IPL 2023 मध्ये मुंबई इंडियन्सला एक नवीन हिरा गवसलाय, जो भविष्यातला स्टार आहे. नेहल वढेरा असं या खेळाडूच नाव आहे. 22 वर्षांचा हा तरुण मुलगा आयपीएलमध्ये सरस कामगिरी करतोय. काल RCB विरुद्ध त्याआधी CSK विरुद्ध या खेळाडूने मुंबईकडून दमदार कामगिरी केली होती. लेफ्टी बॅट्समन असलेला नेहल वढेरा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवचा चेला आहे. RCB ची बत्ती गुल करणारी ही गुरु-चेल्याची जोडी आहे.

9 मे रोजी 200 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना जसा गुरु खेळला, हुबेहूब तशीच कामगिरी चेल्याने केली. दोघांनी अर्धशतकं फटकावली. सूर्यकुमार यादवच्या हाफ सेंच्युरीने प्रतिस्पर्धी टीमची वाट लागली, तर नेहल वढेराच्या हाफ सेंच्युरीने टीमला लक्ष्यापर्यंत पोहोचवलं. नेहल वढेराने 34 चेंडूत नाबाद 52 धावा केल्या. यात 4 फोर आणि 3 सिक्स आहेत.

नेहल काय म्हणाला?

ज्याच्याकडून शिकायला मिळतं, तो गुरु असतो. IPL मध्ये सूर्यकुमार यादव नेहल वढेरासाठी त्याच भूमिकेत आहे. “आधी मी लोअर ऑर्डरमध्ये बॅटिंग करायचो. पण RCB विरुद्ध टॉप ऑर्डरमध्ये बॅटिंग करण्याची मजा आली” असं नेहल वढेराने सांगितलं. आयपीएलमधील बॅक टू बॅक फिफ्टीवर त्याने आनंद व्यक्त केला.


20 लाखात कोट्याधीश खेळाडूसारखी कामगिरी

मुंबई इंडियन्सने 20 लाख रुपयाच्या बेस प्राइसला नेहल वढेराला विकत घेतलं होतं. 20 लाख रुपये किंमतीतील हा खेळाडू मुंबई इंडियन्ससाठी यशस्वी कामगिरी करतोय. कोट्यवधी रुपये घेणारा खेळाडू सुद्धा अशी कामगिरी करत नाही. त्याने आतापर्यंत 6 इनिंगमध्ये 183 धावा केल्या आहेत. यात 2 हाफ सेंच्युरी आहेत.

कोण आहे नेहल वढेरा?

नेहल वढेरा हा 22 वर्षांचा लुधियाना पंजाबचा क्रिकेटपटू आहे. तो टॉप ऑर्डरमधील बॅट्समन असून चौफेर फटकेबाजी करण्याची त्याची क्षमता आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात रणजी ट्रॉफी स्पर्धेत गुजरात विरुद्ध 123 धावांची शतकी खेळी साकारुन नेहल वेढराने प्रभावित केलं. त्यानंतर मध्य प्रदेश विरुद्ध 214 धावा फटकावल्या.

भारताकडून अंडर 19 मध्ये डेब्यु करतानाही त्याने चांगली कामगिरी केली. त्याने श्रीलंकेविरुद्ध 81 धावांची खेळी केली होती. मुंबई इंडियन्सची त्याच्यावर नजर पडली व 20 लाख रुपयांच्या बेस प्राइसला विकत घेतलं.