मुंबई : शिक्षण घेतल्याने माणसाची प्रगती होते असं सांगितलं जातं. पण एका क्रिकेटपटूने हे म्हणणंच खोटं ठरवलं आहे. वडील शिक्षक असतानाही कॉपी करून नापास झालेल्या क्रिकेटपटूने बॅट हातात धरली. मैदानात उतरला अन् आपल्या खेळाची जादू दाखवत खोऱ्याने पैसा कमावण्यास सुरुवात केली आहे. नितीश राणा असं या खेळाडूचं नाव आहे. नितीश सध्या कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार आहे. आयपीएलमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी तो एक आहे. कधी काळी कॉपी करूनही नापास झालेला नितीश आज खोऱ्याने पैसा कमावत आहे.
कोलकाता नाइट रायडर्सच्या सोशल मीडिया हँडवलर त्याचा एक जुना व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यात तो कॉपी करूनही फेल झाल्याचं म्हटलं आहे. नीतीश राणाचे वडील शिक्षक होते. त्याच्या वडिलांनी त्याला कधीच मारलं नाही. मात्र, आईने अनेकवेळा बदडल्याचं तो सांगतो. नितीशच्या या विधानावरून तोही सर्वसाधारण विद्यार्थ्यांसारखाच असल्याचं दिसून येतं. त्याने त्याच्या कर्तृत्वाच्या जोरावर क्रिकेट क्षेत्रात नाव कमावलं. शिक्षणात त्याला यशस्वी होता आलं नाही. पण क्रिकेट विश्वात त्याला नाव कमावता आलं आहे.
आयपीएल 2023 नितीश राणासाठी अग्निपरीक्षेपेक्षा कमी नाही. सीजन सुरू होण्यापूर्वीच कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर जखमी झाला होता. त्यामुळे त्याला टीममधून बाहेर जावं लागलं. अय्यर जखमी झाल्याने नितीशकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं. त्याच्या टीममध्ये रसेल, सुनील नरेनसारखे अनुभवी खेळाडू असतानाही केकेआरने नितीशवर विश्वास टाकला. नितीशचं कर्णधारपद तेवढं यशस्वी झालेलं नाही. पण याचा अर्थ तो कर्णधार म्हणून अगदीच फेलही गेलेला नाहीये. कोलकाताने 5 सामन्यांपैकी दोन सामने जिंकले आहेत. तर तीन सामन्यात पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. कोलकाता टीम अंक तालिकेत सातव्या स्थानावर आहे.
नितीश राणाला पुढचं आव्हान दिल्ली कॅपिटल्सचं आहे. दिल्लीच्या अरुण जेटलरी स्टेडियममध्ये दोन्ही संघात भिडत होणार आहे. आज हा सामना रंगणार आहे. कोलाकात्याला तिसरा विजय मिळवून देण्याची नितीशकडे संधी आहे. यंदाच्या मोसमात दिल्ली टीमचा परफॉर्मन्स खराब झालेला आहे. यंदाच्या मोसमात आयपीएलमध्ये एकही सामना न जिंकलेला दिल्लीचा संघ हा एकमेव संघ आहे. दिल्लीने सर्वच्या सर्व पाच सामने गमावले आहेत. त्यामुळे या संधीचं नितीश राणा कसं सोनं करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नितीश राणा हा आक्रमक अष्टपैलू खेळाडू आहे. 27 डिसेंबर 1993मध्ये दिल्लीत त्याचा जन्म झाला. त्याच्या वडिलांचे नाव तारासिंह राणा आहे. तर आईचं नाव सतीश राणा आहे. नितीशला एक मोठा भाऊ आहे. त्याचं नाव आशिष राणा आहे. डीएव्ही सेंटेनरी पब्लिक स्कूलमधून त्याने शिक्षण घेतलं होतं. नंतर विद्या जैन स्कूलमध्ये त्याने पुढील शिक्षण घेतलं. नितीश विवाहित आहे. 2019मध्ये त्याने सांची मारवाह हिच्याशी विवाह केला होता. सांची इंटिरिअर डिझायनर आहे.
नितीशकडे एकूण 3.8 मिलियन डॉलर संपत्ती आहे. म्हणजे 30 कोटी रुपयांची संपत्ती त्याच्याकडे आहे. आयपीएल सामन्यातूनच त्याने ही संपत्ती कमावली आहे. त्याची महिन्याची सॅलरीच 8 कोटी आहे. तो कोणत्याही उत्पादनाचा ब्रँड अॅम्बेसिडर नाहीये.