GT vs MI IPL 2022 Match prediction: हार्दिकसाठी उद्याची इमोशनल मॅच, गुजरातला हरवून मुंबई दुसऱ्या संघांचा खेळ बिघडवेल?

| Updated on: May 05, 2022 | 2:33 PM

GT vs MI IPL 2022 Match prediction: गुजरात टायटन्सच्या संघात वरच्या फळीतील फलंदाजांनी सातत्याने निराश केलं आहे. त्यांचे आघाडीचे फलंदाज लवकर तंबूत परतले आहेत.

GT vs MI IPL 2022 Match prediction: हार्दिकसाठी उद्याची इमोशनल मॅच, गुजरातला हरवून मुंबई दुसऱ्या संघांचा खेळ बिघडवेल?
Gujarat Titans vs Mumbai Indians
Image Credit source: IPL
Follow us on

मुंबई: हार्दिक पंड्यासाठी (Hardik Pandya) उद्याचा दिवस थोडा वेगळा असेल. या दिवशी मैदानावर खेळताना हार्दिक पंड्या थोडा इमोशनल दिसू शकतो. शुक्रवारी गुजरात टायटन्सचा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध होणार आहे. हार्दिकचं ज्या टीमने करियर बनवलं, त्या संघाविरोधात खेळण्यासाठी हार्दिक मैदानावर उतरणार आहे. आयपीएल 2022 मध्ये ब्रेबॉर्न स्टेडियमवर ही मॅच होणार आहे. हार्दिकने मुंबई इंडियन्समधून आय़पीएलमधील आपलं करियर सुरु केलं होतं. आज तो गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) कॅप्टन आहे. मागच्या सीजनपर्यंत तो मुंबई इंडियन्सकडून खेळत होता. या वर्षीच्या मेगा ऑक्शनआधी मुंबईच्या टीमने हार्दिकला रिटेन केलं नाही. मागच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा पंजाब किंग्सने पराभव केला होता. मुंबई यंदाच्या सीजनमधला एक कमकुवत संघ आहे. पाचवेळा आयपीएलचे जेतेपद पटकावणाऱ्या या टीमने यंदा सलग आठ सामने गमावले आहेत. फक्त त्यांनी राजस्थान रॉयल्स विरुद्ध एकमेव विजय मिळवला आहे. त्यामुळे हार्दिक उद्याच्या मॅचमध्ये मुंबईला हरवून पुन्हा एकदा टीमला विजयी ट्रॅकवर आणण्याचा प्रयत्न करेल.

फलंदाजीत गुजरातचं काय चुकतय?

गुजरात टायटन्सच्या संघात वरच्या फळीतील फलंदाजांनी सातत्याने निराश केलं आहे. त्यांचे आघाडीचे फलंदाज लवकर तंबूत परतले आहेत. पण आता सीजन शेवटाकडे जात असताना, त्यांना या कमतरतेवर मात करावी लागेल. पॉइंटस टेबलमध्ये गुजरातची टीम 16 पॉइंटससह अव्वल स्थानावर आहे. शुक्रवारी मुंबई विरुद्ध विजय मिळवून ते प्लेऑफ मधील स्थान पक्क करण्याचं प्रयत्न करतील.

सलामीला येणाऱ्या शुभमन गिलच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसला आहे. मॅथ्यू वेडच्या जागी ऋदिमान साहाला संधी देण्यात आली. तो चांगली सुरुवात करतोय, पण तीच लय त्याला कायम राखता येत नाहीय. पंजाब विरुद्धच्या सामन्यात साई सुदर्शनच्या खेळीमुळे गुजरातला लढण्याइतपत धावसंख्या उभारता आली. त्याने 50 चेंडूत नाबाद 65 धावा केल्या. हार्दिक पंड्या, डेविड मिलर, राहुल तेवतिया आणि राशिद खान पंजाब विरुद्ध अपयशी ठरले होते. राशिदने आतापर्यंत चांगली कामगिरी करुन गुजरातच्या विजयाच महत्त्वाचं योगदान दिलं आहे. मागचे दोन सामने सोडल्यास, हार्दिकच्या फलंदाजीत सातत्य दिसलं आहे. त्याने सर्वाधिक 309 धावा केल्या आहेत.

गोलंदाजी गुजरातची ताकत

मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन, अल्जारी जोसेफ आणि राशिद मुळे गुजरातची गोलंदाजीची बाजू मजबूत आहे. मागच्या सामन्यात मोहम्मद शमीने धावा दिल्या. पण नव्या चेंडूने त्याने चांगली गोलंदाजी केली आहे. फर्ग्युसन सुद्धा अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन विकेट काढतोय. राशिदला जास्त विकेट्स मिळाल्या नाहीत, पण त्याने किफायती गोलंदाजी केली आहे.

आता प्रतिष्ठा वाचण्यासाठी लढाई

मुंबई इंडियन्स पॉइंटस टेबल मध्ये तळाला असून प्लेऑफच्या शर्यतीतून हा संघ आधीच बाद झाला आहे. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. रोहित आणि इशानचा खराब फॉर्म कायम आहे. कायरन पोलार्ड आपल्या फिनिशरच्या भूमिकेला न्याय देऊ शकलेला नाही.

मुंबईच्या गोलंदाजांकडून कितपत अपेक्षा?

गोलंदाजी विभागात मुंबईची स्थिती खूपच खराब आहे. जसप्रीत बुमराहने किफायती गोलंदाजी केली. पण त्याला विकेट्स मिळाल्या नाहीत. डॅनियल सॅम्स-मेरेडिथने अधून-मधून चांगलं प्रदर्शन केलं आहे. जसप्रीत बुमराह सोडल्यास मुंबईकडे एकही भरवशाचा गोलंदाज नाहीय.