टी20 वर्ल्डकप विजेत्या टीम इंडियाची वाट चाहते चातकासारखे करत होते. बारबाडोसमध्ये अडकल्याने चाहत्यांची प्रतिक्षा लांबली होती. पण पाच दिवसानंतर टीम इंडिया मायदेशी परतली आहे. दिल्ली परतल्यानंतर टीम इंडियाचं स्वागत तितक्याच जल्लोषात करण्यात आलं. टीम इंडियाने जेतेपदावर 29 जून रोजी नाव कोरलं होतं. पण टीम इंडिया मायदेशी 4 जुलैला पोहोचली. यावेळी दिल्ली विमानतळावर खेळाडूंना चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळालं. यावेळी क्रिकेटपटूंनी नाचून आनंद व्यक्त केला. त्यानंतर भारतीय संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी टीम इंडियासोबत पंतप्रधान मोदी यांच्यासोबत फोटो सेशन करण्यात आलं. यावेळी एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. फोटोत नरेंद्र मोदी तर दिसत आहेत, पण त्याने ट्रॉफीला स्पर्श केलेला नाही. फोटोत स्पष्ट दिसत आहे की, पंतप्रधान मोदींनी कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याचा हात पकडला होता. रोहित शर्मा आणि राहुल द्रविडने एका एका हाताने ट्रॉफी उचलली आहे. तर मोदींनी ट्रॉफीऐवजी या दोघांचा हात पकडला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण असं का? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला तर मग याबाबत जाणून घेऊयात
एका कथित नियमानुसार असं बोललं जातं की, जिंकलेल्या ट्रॉफी किंवा पदकांना फक्त त्या व्यक्तीने किंवा संघाने हात लावावा. या ट्रॉफीवर फक्त त्यांचाच हक्क असतो, असं मानलं जातं. फीफा विश्वचषकातही असं चित्र पाहायला मिळतं. पंतप्रधान मोदींनी भारतीय संघ आणि खेळाडूंना असं करण्यास सांगितल्याचं बोललं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृतीचं आता सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाच्या पदरी निराशा पडली होती. तेव्हाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंची ड्रेसिंग रुममध्ये भेट घेतली होती आणि सांत्वन केलं होतं. आता टीम इंडियाने विजय मिळवून पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.
PM Narendra Modi didn’t hold the World Cup trophy, instead held Rohit and David’s hands. 🌟 pic.twitter.com/0gzbfHxGmx
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 4, 2024
Together in lose
Together in win pic.twitter.com/UCdyjEMt2K— T20 World Cup 2024 Commentary (@T20WorldCupClub) July 4, 2024
बीसीसीआयने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक खास जर्सी गिफ्ट म्हणून दिली. या जर्सीवर 1 नंबर असून नमो असं लिहिलं आहे. बीसीसीआय सचिव जय शाह आणि अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी ही जर्सी भेट दिली. भारतीय संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात जवळपास दीड तास चर्चा रंगली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खेळाडूंशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.