नवी दिल्ली, दि.24 डिसेंबर | भारत आणि दक्षिण आफ्रिकेत 26 डिसेंबरपासून कसोटी सामना सुरु होत आहे. हा सामना दक्षिण आफ्रिकेतील सेंचुरियन मैदानावर खेळवण्यात येणार आहे. तसेच पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियात मेलबर्न येथे 26 डिसेंबरपासून कसोटी सामना होणार आहे. हे दोन्ही सामने बॉक्सिंग डेला खेळवले जाणार आहे. बॉक्सिंग डेला क्रिकेटचे स्टेडियम खचाखच प्रेक्षकांच्या गर्दीने भरलेले असते. प्रेक्षकांचा उत्साह मोठा असतो. परंतु क्रिकेट आणि बॉक्सिंगचा काही संबंध नसतो. मग का म्हटले जातेय बॉक्सिंग डे सामना…
बॉक्सिंग डे म्हणजे मुष्टीयुद्ध आणि क्रिकेटचा काही संबंध नाही. संबंध 26 डिसेंबर या तारखेशी आहे. 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस साजरा केला जातो. त्यानंतर येणारा दुसऱ्या दिवसाला बॉक्सिंग डे म्हटले जाते. बॉक्सिंग डे त्या लोकांना समर्पित केले जाते, जे 25 डिसेंबर रोजी सुटी न घेता काम करत असतात. बॉक्सिंग डे च्या दिवशी लोकांना भेटवस्तू देऊन आभार व्यक्त केले जाते. थोडक्यात नाताळनंतर येणाऱ्या दुसऱ्या दिवसाला बॉक्सिंग डे म्हटले जाते.
क्रिकेटशिवाय इतर खेळात बॉक्सिंग डे सामने खेळले जातात. बॉक्सिंग डे सामन्याला सुरुवात 1892 मध्ये झाली. ऑस्ट्रेलियात देशातंर्गत टुर्नामेंटमध्ये हा सामना खेळाला गेला. भारतीय संघ आतापर्यंत 17 बॉक्सिंग डे सामने खेळला आहे. आतापर्यंत भारताला बॉक्सिंग डे सामन्यांत यश मिळाले नाही. आता ही परंपरा यंदा टीम इंडिया मोडणार का? हे सामन्याच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.