IND vs ENG | सध्या टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्ध T20 सीरीज खेळत आहे. या महिन्याच्या अखेरीस टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरीज खेळणार आहे. शुक्रवारी इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या दोन टेस्टसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. दिग्गज खेळाडूंना टीममध्ये स्थान देण्यात आलय. या टीममध्ये तीन विकेटकीपर आहेत. पण कमालीची बाब म्हणजे टॅलेंटेड, अनुभवी विकेटकीपरला टीममध्ये स्थान देण्यात आलेलं नाहीय. आता प्रश्न हा निर्माण झालाय की, अखेर इशान किशनला कुठली शिक्षा मिळतेय. इशान किशनबद्दल मागच्या तीन-चार दिवसांपासून चर्चा होत आहे. त्याच टीम इंडियात कोणाबरोबर मतभेद झालेत का? हे प्रत्येकाला जाणून घ्यायच आहे. इशान किशन दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरुन माघारी आला व अफगाणिस्तान विरुद्धच्या टी 20 सीरीजसाठी सुद्धा त्याची निवड झाली नाही. आता इंग्लंड विरुद्धच्या सीरीजसाठी सुद्धा त्याचा विचार झालेला नाही.
आधी असं म्हटल जात होतं की, केएल राहुल या सीरीजमध्ये फक्त फलंदाज म्हणून खेळेल. त्यामुळे विकेटकीपर म्हणून इशान किशनला संधी मिळू शकते. पण टीम इंडियाने तीन विकेटकीपर्सची निवड केलीय. यात केएस भरत, केएल राहुल आणि ध्रुव जुरेलला संधी दिलीय. आता प्रश्न हा आहे की, इशान किशनला का नाही स्थान मिळालं?. आता चर्चा अशी आहे की, इशान किशनवर टीम इंडिया नाराज आहे का?
बीसीसीआय त्याच्यावर नाराज असण्याच हे कारण?
इशान किशनने दक्षिण आफ्रिका दौरा अर्ध्यावर सोडला होता. मानसिक दबावाच कारण देऊन त्याने बीसीसीआयकडे सुट्टी मागितली. बीसीसीआयने त्याला सुट्टी दिली. पण काही दिवसांनी तो मित्रांसोबत पार्टी करताना दिसला. कदाचित हे टीम इंडिया आणि बीसीसीआयला आवडलं नाही. ब्रेकच्या काळात तो एका टीव्ही शो मध्येही दिसला.
राहुल द्रविड यांनी काय सल्ला दिलेला?
अफगाणिस्तान विरुद्धच्या T20 सीरीजसाठी सुद्धा त्याची निवड झाली नाही. हेड कोच राहुल द्रविड यांनी इशान किशनला रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळण्याचा सल्ला दिला होता. देशांतर्गत क्रिकेट खेळून टीम इंडियाच कमबॅक करण्याचा सल्ला दिला होता. पण इशानने यापैकी काहीही केलेलं नाहीय.
पहिल्या-दुसऱ्या टेस्टसाठी स्क्वॉड
रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरैल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आवेश खान.