IND vs SA Test | इंग्लंडमध्ये जिंकलो, न्यूझीलंडमध्ये विजयी पताका फडकवली, ऑस्ट्रेलियाची घमेंड मोडली पण टीम इंडियाला अशीच कामगिरी दक्षिण आफ्रिकेत का करता आलेली नाही?. मागच्या 31 वर्षांपासून टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरीज का जिंकता आलेली नाही? गांगुलीपासून धोनी आणि विराट सारख्या अव्वल कर्णधारांनाही दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरीज जिंकण का जमलेलं नाही?. रोहित शर्माने या प्रश्नाच उत्तर द्याव, अशी टीम इंडियाच्या फॅन्सची इच्छा असेल. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आजपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची सीरीज खेळणार आहे. मंगळवारी सेंच्युरियनवर पहिला कसोटी सामना होईल.
यावेळी टीम इंडियाला इतिहास रचण शक्य होईल का? हा मुख्य प्रश्न आहे. या प्रश्नाच उत्तर टेस्ट सीरीज संपल्यानंतरच मिळेल. पण दक्षिण आफ्रिकन भूमीवर टेस्ट सीरीज जिंकण टीम इंडियाला अजूनपर्यंत का शक्य झालेलं नाही? ते जाणून घेऊया.
दक्षिण आफ्रिकेत अपयशाच पहिल कारण
दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्ट्या या दुसऱ्या देशातील विकेटपेक्षा भिन्न आहेत. इथे जगातील अन्य पिचेसपेक्षा चेंडूला जास्त उसळी मिळते. चेंडू स्विंग आणि सीम दोन्ही होतो. म्हणजे चेंडू हवेतच मूव्ह होतो. टीम इंडियाच्या फलंदाजांना अशा खेळपट्टयांची सवय नाहीय. परिणामी टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेत यश मिळत नाही.
अपयशाच दुसरं कारण
फलंदाजीवर अवलंबून राहण हे सुद्धा टीम इंडियाच्या पराभवामागच एक कारण आहे. विराट कोहली एक असा भारतीय फलंदाज आहे, ज्याने दक्षिण आफ्रिकेत 50 पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आहेत. अन्य दुसऱ्या कुठल्याही फलंदाजाची सरासरी 40 पेक्षा कमी आहे. म्हणजे अन्य भारतीय फलंदाजांच्या टेक्निकमध्ये काही ना काही कमतरता आहे. त्यामुळे ते दक्षिण आफ्रिकेत धावा बनवू शकत नाहीत.
तिसरं कारण
दक्षिण आफ्रिकेत टीम इंडिया दाखल होते, पण इथे जी आव्हानात्मक परिस्थिती आहे, त्यानुसार टीमची तयारी होत नाही. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेत पोहोचून फक्त एक इंट्रा-स्क्वाड सामना खेळला आहे. वॉर्म-अप मॅचच्या माध्यमातून परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला नाही. मागच्या काही वर्षात असच पहायला मिळालय. परिणामी टीम इंडिया जिंकू शकली नाही.
चौथ कारण
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेत नेहमीच चांगल प्रदर्शन केलय. पण दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांना आपल्या विकेटवर एक खास फायदा मिळतो, ती म्हणजे त्यांची उंची. दक्षिण आफ्रिकन गोलंदाज भारतीय बॉलर्सपेक्षा जास्त उंच असतात. त्यामुळे त्यांना आपल्या विकेटवर चेंडूला जास्त उसळी देता येते.
अपयशाच पाचव कारण
दक्षिण आफ्रिकन फलंदाजांना आपल्या देशातील पीचेसची चांगली कल्पना असते. क्रिकेटचे धडे त्यांनी याच विकेटवर गिरवलेत त्याशिवाय देशांतर्गत क्रिकेट ते याच ठिकाणी खेळतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सामन्यात याचा त्यांना फायदा मिळणं स्वाभाविक आहे.