Jasprit Bumrah : अजित आगरकरांनी जसप्रीत बुमराहला टीममध्ये निवडलं, पण त्याच्यासोबत असा अन्याय का केला?

| Updated on: Sep 09, 2024 | 12:38 PM

Jasprit Bumrah : टीम इंडिया बांग्लादेश विरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची टीममध्ये निवड झालीय. पण त्याचवेळी त्याच्यासोबत एक अन्याय सुद्धा झालाय.

Jasprit Bumrah : अजित आगरकरांनी जसप्रीत बुमराहला टीममध्ये निवडलं, पण त्याच्यासोबत असा अन्याय का केला?
jasprit bumrah
Image Credit source: Gareth Copley/Getty Images
Follow us on

बांग्लादेश विरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. भारतीय टीमची घोषणा करतानाच जसप्रीत बुमराहसोबत अन्याय झाला आहे. हे स्पष्टपण दिसून येतय. चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. पण त्यामध्ये हे सांगण्यात आलेलं नाही की, रोहित शर्माचा डेप्युटी म्हणजे उपकर्णधार कोण असेल?. याआधी टेस्ट टीमचा उपकर्णधार जसप्रीत बुमराह होता. बांग्लादेश विरुद्ध टेस्ट सीरीजसाठी तोच उपकर्णधार असेल का? हे निवडकर्त्यांनी स्पष्ट केलेलं नाही.

भारतीय निवडकर्त्यांनी असं का केलं? हा मोठा प्रश्न आहे. जसप्रीत बुमराहला टीममध्ये स्थान दिल्यानंतर अजित आगरकरांनी त्याच्यासोबत असं का केलं?. उपकर्णधार म्हणून बुमराहकडे का दुर्लक्ष केलं? भारतीय सिलेक्टर्स बुमराहला उपकर्णधारपदी कायम ठेवण्याच्या मूडमध्ये नाहीयत का? असे अनेक प्रश्न यामुळे निर्माण झालेत. बांग्लादेश विरुद्धच्या टेस्ट सीरीजसाठी जसप्रीत बुमराह उपकर्णधारपदी नसेल असा आधीपासूनच अंदाज वर्तवण्यात येत होता.

असा निर्णय घेण्यामागे काय कारण?

आता जसप्रीत बुमराहच्या जागी टेस्ट टीममध्ये उपकर्णधार कोण असेल? हा पुढचा प्रश्न आहे. पण सिलेक्टर्सनी जसप्रीत बुमराहला उपकर्णधारपदावरुन हटवण्याचा निर्णय घेतला आहे, तर त्यामागे काय कारण आहे? बुमराहच्या वर्कलोडशी संबंधित हे कारण असू शकतं. निवडकर्त्यांच लक्ष बुमराहच्या वर्कलोड मॅनेजमेंटवर आहे, अशी बातमी मीडिया रिपोर्ट्समध्ये याआधी सुद्धा आली होती. म्हणूनच बुमराहच्या जागी अन्य कोणाला उपकर्णधार बनवलं जाऊ शकतं.

अशी अपेक्षा आहे

बुमराह नाही, मग कोण? असा आता प्रश्न आहे. बांग्लादेश विरुद्ध टीम इंडियाची घोषणा करताना या प्रश्नाच उत्तर दिलेलं नाही. बांग्लादेश विरुद्ध कसोटी मालिकेनंतर टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध सीरीज खेळणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर नाही, तर निदान ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरीजआधी भारताच्या कसोटी संघाला नवीन उपकर्णधार मिळेल अशी अपेक्षा आहे.