IND vs AUS 3rd Test : प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि विश्लेषक सुनील गावस्कर यांनी रोहित शर्माच्या एका निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. सुनील गावस्कर हे नेहमी स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. काल इंदोर कसोटीचा दुसरा दिवस होता. यावेळी कॅप्टन रोहित शर्माने पहिल्या तासाभरात रविचंद्रन अश्विनला गोलंदाजीसाठी आणलं नाही. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये रविचंद्रन अश्विन सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज आहे. सुनील गावस्कर यांना रोहित शर्माचा हा निर्णय पटला नाही. ड्रिंक्स ब्रेकच्या काही मिनिट आधी रोहितने अश्विनच्या हाती चेंडू सोपवला. तो पर्यंत पीटर हँडसकॉम्ब आणि कॅमरुन ग्रीनची जोडी सेट झाली होती. ऑस्ट्रेलियाकडे पहिल्या डावात 75 धावांची आघाडी होती.
हँडसकॉम्ब आणि ग्रीन दोघे रायटी बॅट्समन खेळपट्टीवर होते. म्हणून रोहितने वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि डावखुरा फिरकी गोलंदाज रविंद्र जाडेजाला गोलंदाजीसाठी आणलं. या दोघांच्या जागी नंतर अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विनला गोलंदाजीसाठी आणलं.
त्याला आधीच चेंडू द्यायला पाहिजे होता
दोन रायटी बॅट्समन विकेटवर होते. म्हणून रविचंद्रन अश्विनला गोलंदाजीसाठी आणलं नाही. ड्रिंक ब्रेक्सच्या एक ओव्हरआधी त्याला बॉलिंग दिली. “एका रायटी आणि लेफ्टी बॉलिंग करत होता, त्याने काय झालं? कोणाला विकेट मिळाली? अश्विनने हँडसकॉम्बची विकेट काढली. तो टॉप खेळाडू आहे. तो विकेट काढून देणार. मग समोर रायटी किंवा लेफ्टी असो फरक पडत नाही. तो महान गोलंदाज आहे. अश्विनच्या खात्यात 450 पेक्षा जास्त विकेट आहेत. त्याला आधीच चेंडू द्यायला पाहिजे होता” असं सुनील गावस्कर स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात म्हणाले.
दोघांनी काढल्या प्रत्येकी 3-3 विकेट
अश्विनने लगेच त्याच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये हँडसकॉम्बची विकेट काढून रिझल्ट दिला. त्याने भागीदारी ब्रेक केली. अश्विन आयसीसीच्या रँकिंगमध्ये नंबर 1 स्थानावर पोहोचलाय. पहिल्याडावात ऑस्ट्रेलियाच्या 6 विकेट 11 धावात पडल्या. उमेश यादव आणि अश्विनने प्रत्येकी 3-3 विकेट काढल्या.