मुंबई: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाली आहे. पुढच्या काही दिवसात ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप (T20 World cup) स्पर्धा सुरु होईल. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे आधीच बाहेर गेला आहे. बीसीसीआयने अजूनपर्यंत बुमराहच्या जागी कोण खेळणार? ते जाहीर केलेलं नाही.
या शर्यतीत मोहम्मद शमी, दीपक चाहर, मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक आहे. मोहम्मद शमी आणि दीपक चाहर स्टँडबाय खेळाडूंमध्ये आहेत. मोहम्मद शमीला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
उमरान मलिकला संधी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. पण त्याला संधी दिल्यास तीन फायदे होऊ शकतात. कदाचित उमरान मलिक या टुर्नामेंटमधून चांगला गोलंदाज म्हणून समोर येऊ शकतो. पण त्यासाठी बीसीसीआयला त्याची निवड करुन एक धोका पत्करावा लागेल. कारण उमरान मलिकडे अनुभवाची मोठी कमतरता आहे. उमरान मलिकला टीममध्ये घेऊन काय तीन फायदे होऊ शकतात? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.