नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये तीन मॅचच्या वनडे सीरीजचा पहिला सामना गुरुवारी बारबाडोसमध्ये झाला. ही मॅच टीम इंडियाने 5 विकेटने जिंकली. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाने शानदार प्रदर्शन केलं. त्यांनी यजमान वेस्ट इंडिजचा डाव 114 धावांवर संपवला. रोहित शर्माने अचूक फिल्डिंग सेट केली. वारंवार गोलंदाजीत बदल केले.
टीम इंडियाने भले 23 ओव्हर्समध्ये वेस्ट इंडिजचा डाव संपवला. पण आपल्याच फिल्डर्सचा गलथानपणा रोहित शर्माला अजिबात सहन झाला नाही.
कितव्या ओव्हरमधील घटना?
मॅच दरम्यान शार्दुल ठाकूरच्या आळशीपणामुळे भारताच एक रन्सच नुकसान झालं. त्यामुळे रोहित त्याच्यावर मैदानात चिडला. रोहित मैदानात आपल्याच प्लेयरवर चिडण्याची ही पहिली वेळ नाहीय. वेस्ट इंडिजच्या डावातील ही 19 व्या ओव्हरमधील ही घटना आहे.
Rohit Sharma praising Shardul Thakur for his fielding effort.#INDvsWI pic.twitter.com/121NrAKQhY
— Foax Cricket News (@FoaxCricket) July 27, 2023
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
कुलदीप यादवच्या एका चेंडूवर कॅप्टन शे होप मिडऑफला शॉट मारला व दोन धावा पळून काढल्या. फिल्डर दूर असल्याने या चेंडूवर दोन रन मिळणं स्वाभाविक होतं. शार्दुल ठाकूर चेंडूपर्यंत खूप उशिराने पोहोचला. या दरम्यान तो आळशी दिसला. शार्दुलची फिल्डिंग पाहून शे होपने आणखी एक धाव चोरली. आपल्या खेळाडूचा असा परफॉर्मन्स पाहून रोहित शर्मा वैतागला. रोहित शर्मा शार्दुलवर चिडला. त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
वेस्ट इंडिजचा डाव 114 धावावर संपवण्यात स्पिनर्सनी महत्वाची भूमिका बजावली. कुलदीप यादवने 4 आणि रवींद्र जाडेजाने 3 विकेट काढले. कुलदीप आणि जाडेजा एकाच सामन्यात 7 विकेट घेणारी पहिली भारतीय डावखुरी गोलंदाजांची जोडी बनली. टीम इंडियाने 22.5 ओव्हर्समध्ये 5 विकेट गमावून हे लक्ष्य गाठलं.