बारबाडोस : टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्ध टेस्ट आणि वनडे सीरीजसाठी काही नव्या खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला होता. आगामी काळात सीनियर खेळाडूंना बदलावं लागलं, तर त्यांच्या जागी नव्या खेळाडूंची फळी तयारी असावी, हा त्यामागे उद्देश होता. काही प्रमाणात यात टीम इंडियाला यश मिळालय असं म्हणायला हरकत नाही. याच कारण आहे मुकेश कुमार. टेस्ट सीरीजमध्ये डेब्यु केल्यानंतर मुकेश कुमारने वनडेमध्ये आपली क्षमता दाखवून दिली.
तिसऱ्या वनडेत नव्या चेंडूने घातक गोलंदाजी केली. वेस्ट इंडिजची वाट लावून टाकली. फलंदाजीत सध्या टीम इंडियाकडे अनेक पर्याय आहेत. पण गोलंदाजीच्या बाबतीत अशी स्थिती नाहीय.
त्याने निराश केलं नाही
टीम इंडियाला चांगल्या वेगवान गोलंदाजांची फळी उभी करायची आहे. म्हणून वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी बंगालचा पेसर मुकेश कुमारचा टीममध्ये समावेश करण्यात आला होता. पोर्ट ऑफ स्पेन येथे दुसऱ्या कसोटीत मुकेश कुमारने डेब्यु केला. त्यावेळी त्याने आपल्या स्विंग गोलंदाजीने प्रभावित केलं. त्यानंतर मुकेश कुमारला वनडे सीरीजमध्ये संधी मिळाली. तिथेही त्याने निराश केलं नाही.
21 चेंडूत वेस्ट इंडिजला गुडघे टेकायला भाग पाडलं
पहिल्या वनडेत भारताच्या फिरकी गोलंदाजांनी वेस्ट इंडिजला आपल्या जाळ्यात अडकवल होतं. तिसऱ्या वनडेत हेच काम वेगवान गोलंदाजांनी केली. मुकेशने त्याचा पाया रचला. टीम इंडियाने या पीचवर 351 धावांचा डोंगर उभा केला होता. विंडिजचे फलंदाज सुरुवातीपासूनच संघर्ष करत होते. मुकेशने खासकरुन आपल्या 21 चेंडूत वेस्ट इंडिजला गुडघे टेकायला भाग पाडलं.
….पण यावेळी मेयर्स चुकला
मुकेश कुमारने आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये ब्रँडन किंगला सातत्याने चकवलं. नंतर त्याची विकेट घेतली. तिसऱ्या ओव्हरमध्ये काइल मेयर्सने पॉइंटच्या दिशेने खणखणीत चौकार मारला. मेयर्सचे इरादे लगेच मुकेशच्या लक्षात आले. त्याने राऊंड द विकेट गोलंदाजी सुरु केली. मेयर्सने पुन्हा तसाच शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी मेयर्स चुकला. तो बोल्ड झाला.
मेडन ओव्हर
मुकेशने आपल्या चौथ्या ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजच्या पराभवावर शिक्कामोर्तब केलं. त्याने तिसऱ्या चेंडूवर विंडीजचा कॅप्टन शे होपला एका आऊटस्विंगवर स्लीपमध्ये शुभमन गिलकरवी कॅचआऊट केलं. मुकेशची ही मेडन ओव्हर होती.
Mukesh Kumar is in a hurry to finish things off! Can he convert it into a fifer?#INDvWIAdFreeonFanCode #WIvIND pic.twitter.com/wWPNTY853m
— FanCode (@FanCode) August 1, 2023
त्याने किती विकेट काढल्या?
त्यानंतर मुकेशला आणखी यश मिळालं नाही. पण अन्य गोलंदाजांकरीत मॅच संपवण्याचा प्लॅटफॉर्म त्याने तयार केला. मुकेश कुमारने 7 ओव्हरमध्ये 30 धावा देऊन 3 विकेट काढल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी सुरुवात करुन मुकेश कुमारने त्याच्याविषयी अपेक्षा निर्माण केल्या आहेत.