नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीमसाठी मागच्या एक दशकात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी आपल्या बॅटने भरपूर योगदान दिलय. तिन्ही फॉर्मेटमध्ये या दोन्ही मॉडर्न सुपरस्टार्सनी धावांचा पाऊस पाडला. टीम इंडियाला अनेक सामने आणि सीरीज जिंकवून दिल्या. आता हे दोघे नसताना, टीम इंडियाचा पराभव होतो, तेव्हा चाहत्यांना चिंता वाटण स्वाभाविक आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावर T20 सीरीजमध्ये पहिल्या दोन सामन्याात टीम इंडियाचा पराभव झाला.
या पराभवानंतर रोहित-विराटचा टीममध्ये समावेश करावा,अशी मागणी सुरु झाली. आता तिसऱ्या T20 सामन्यात अखेर टीम इंडियाने पहिला विजय मिळवलाय. यानंतर कॅप्टन हार्दिक पांड्याने जे संकेत दिलेत, ते कदाचित अनेक क्रिकेट फॅन्सन आवडणार नाही.
अखेर टीम इंडियाने विजयाला गवसणी घातली
गुयानामध्ये मंगळवारी टीम इंडियाने टी 20 सीरीजमधील पहिला विजय मिळवला. याच प्रोविडेंस स्टेडियममध्ये 48 तास आधी टीम इंडियाचा सीरीजमधील सलग दुसरा पराभव झाला होता. पाच मॅचच्या सीरीजमध्ये वेस्ट इंडिज 2-0 ने आघाडीवर होती. त्यामुळे युवा टीम आणि हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत होतं. निशाण्यावर टीमचे फलंदाज होते. आयपीएलच्या दोन महिन्यात दमदार फलंदाजी करणारे हे खेळाडू इथे फेल ठरत होते. अखेर तिसऱ्या T20 मध्ये टीम इंडियाला सूर गवसला व 7 विकेटने विजय मिळवला.
दोघांचा समावेश नाही
सीरीजच्या पहिल्या दोन सामन्यात पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर फॅन्स रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा टीममध्ये समावेश करण्याची मागणी करत होते. मागच्यावर्षी T20 वर्ल्ड कप झाला. त्यानंतर या दोघांचा T20 फॉर्मेटमध्ये समावेश केलेला नाहीय. भविष्याचा विचार करुन टीममध्ये अनेक बदल करण्यात येत आहेत. प्रयोग सुरु आहेत.
हार्दिक पांड्या काय म्हणाला?
मॅच संपल्यानंतर बोलताना हार्दिकने काही संकेत दिले. “हीच टीम आता पुढे खेळत राहील. रोहित-कोहली सारख्या सिनियर खेळाडूंच या फॉर्मेटमध्ये पुनरागमन होणार नाही. दोन पराभव किंवा दोन विजयाने गोष्टी बदलत नाहीत. टीम भविष्याच्या योजनांवर काम करतेय” असं हार्दिक पांड्या म्हणाला.