फ्लोरिडा : जास्त बोलणं चांगलं नसतं. पुढे-मागे याची किंमत चुकवावी लागते. भारताच्या टी 20 टीमचा कॅप्टन हार्दिक पांड्याच्या लक्षात ही गोष्ट आली असेल. वेस्ट इंडिज विरुद्ध अखेरच्या पाचव्या टी 20 सामन्यामध्ये हा धडा शिकायला मिळाला. पाच मॅचच्या टी 20 सीरीजमध्ये वेस्ट इंडिजने अखेरच्या टी 20 सामन्यात टीम इंडियावर 8 विकेटने विजय मिळवला. ही सीरीज विंडिजने 3-2 ने जिंकली. निकोलस पूरन वेस्ट इंडिजच्या विजयाचा हिरो ठरला. त्याला प्लेयर ऑफ द मॅच म्हणून निवडण्यात आलं.
टीमला विजय मिळवून देण्याशिवाय पूरनने टीम इंडियाच्या कॅप्टनलाही उत्तर दिलं. हार्दिकने काही दिवसांपूर्वी निकोलस पूरनला चॅलेंज दिलं होतं.
किती वर्षानंतर विंडिजने टीम इंडिया विरुद्ध मिळवला विजय?
फ्लोरिडामध्ये सामना झाला. रविवार 13 ऑगस्टची संध्याकाळ वेस्ट इंडिजसाठी संस्मरणीय ठरली. 6 वर्षानंतर वेस्ट इंडिजने टीम इंडियाला कुठल्या सीरीजमध्ये पराभूत केलय. शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजला विजयासाठी 166 धावांच टार्गेट दिलं होतं. विडिंजने 18 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून हे लक्ष्य पार केलं.
हार्दिकने दिलेलं चॅलेंज पूरनकडून पूर्ण
रोमारियो शेफर्ड आणि ब्रैंडन किंग विजयाचे हिरो ठरले. पण निकोलस पूरनने देखील योगदान दिलं. पूरनने 47 धावा केल्या. किंगसोबत त्याने शतकी भागीदारी केली. दुसरा विकेट गेल्यानंतर क्रीजवर आलेल्या पूरनने सिक्सने इनिंगची सुरुवात केली. त्याने सलग दोन सिक्स मारले. महत्त्वाच म्हणजे टीम इंडियाचा कॅप्टन हार्दिक पांड्याच्या ओव्हरमध्ये त्याने हे सिक्स मारले. पूरनने एक प्रकारे हार्दिकने दिलेलं चॅलेंज पूर्ण केलं. 5 दिवसांपूर्वी टीम इंडियाच्या विजयानंतर हार्दिक पांड्याने हे चॅलेंज दिलं होतं.
Six or nothing for Nicholas Pooran 🔥
A power-packed start for the Calypso batter 👊#WIvIND #SabJawaabMilenge #JioCinema pic.twitter.com/DLKUNzRUZr
— JioCinema (@JioCinema) August 13, 2023
हार्दिकने काय चॅलेंज दिलेलं?
तिसऱ्या टी 20 मधील विजयानंतर हार्दिकने हे चॅलेंज दिलं होतं. निकोलस पूरनला धावा करायच्या असीतल, तर त्याने माझ्या बॉलिंगवर धावा करुन दाखवाव्यात. चौथ्या टी 20 सामन्यात पूरनने माझ्या बॉलिंगवर हल्ला चढवावा, असं हार्दिक म्हणाला होता. चौथ्या टी 20 सामन्यात दोघे आमने-सामने आले नाहीत. पण पूरनने पाचव्या निर्णायक सामन्यात हार्दिकच्या गोलंदाजीवर धावा कुटल्या.