मुंबई: भारताने वनडे प्रमाणेच टी 20 मालिकेत वेस्ट इंडिज विरुद्ध एकतर्फी विजय मिळवला. भारताने ही टी 20 सीरीज 4-1 अशी जिंकली. या पाच सामन्यांच्या मालिकेत त्याला फक्त एक मॅच मध्ये खेळण्याची संधी मिळाली. ती सुद्धा शेवटच्या सामन्यात. पण त्याने त्या संधीचा पुरेपूर फायदा उचलला. एक मॅच खेळला, पण जबरदस्त खेळला. त्याने स्वत:ची छाप उमटवली. त्या गोलंदाजाचं नाव आहे, कुलदीप यादव. भारताचा हा चायनामन गोलंदाज 6 महिन्यानंतर पहिली टी 20 सामना खेळला. कुलदीपने या मॅच मध्ये कमालीचं प्रदर्शन केलं. डावखुऱ्या कुलदीपने आपल्या फिरकीच्या जाळ्यात वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना अगदी सहज अडकवलं. तो आला, तो खेळला, त्याने जिंकलं, असच कुलदीपच्या कामगिरीच वर्णन करावं लागेल.
कुलदीप यादवने या मॅच मध्ये 4 षटकात 12 धावा देत 3 विकेट काढल्या. यात एक मेडन ओव्हर होती. कुलदीपने या मॅच मध्ये तब्बल 16 निर्धाव चेंडू टाकले. त्यावरुन त्याच्या भन्नाट गोलंदाजीची कल्पना येते. वाट्याला आलेल्या 24 पैकी 16 चेंडूत त्याने वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना एक धावही घेऊ दिली नाही. फक्त त्याने एक चौकार दिला. वेस्ट इंडिज विरुद्ध भारतीय फिरकी गोलंदाजांनी इतिहास रचला. कुलदीप यादवही त्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार आहे. वेस्ट इंडिजचे सर्वच्या सर्व 10 विकेट भारतीय फिरकी गोलंदाजांनी घेतले. यात कुलदीपने 3 विकेट काढले.
वेस्ट इंडिजचा कॅप्टन निकोल पूरनला अवघ्या 3 रन्सवर पायचीत पकडून कुलदीपने विकेट काढायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने एकाच ओव्हर मध्ये 2 विकेट काढल्या. यात डॅरेन ड्रेक्स आणि ओडियन स्मिथचा समावेश आहे.
.@imkuldeep18 was truly on fire today! His brilliant 3-fer was crucial for India’s victory.
Watch all the action from the India tour of West Indies LIVE, only on #FanCode ? https://t.co/RCdQk12YsM@BCCI @windiescricket
#WIvIND #INDvsWIonFanCode #INDvsWI pic.twitter.com/pSZAa1HVjc— FanCode (@FanCode) August 7, 2022
कुलदीप यादव दुखापतीमुळे बाहेर होता. वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेतून त्याने पुनरागमन केलं. त्याने आयपीएल 2022 मध्ये 14 सामन्यात खेळताना 21 विकेट काढल्या. त्यामुळे त्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी संघात निवड झाली होती. पण तेव्हा दुखापत झाली, तेव्हापासून तो संघाबाहेर होता. भारतासाठी तो 6 महिन्यानंतर पहिला टी 20 सामना खेळला.