नवी दिल्ली: वेस्ट इंडिज विरुद्ध दुसऱ्या टी 20 सामन्यात हर्षल पटेलला दुखापत झाली आहे. त्यामुळे पुढच्या दोन सामन्यांना तो मुकणार आहे. हर्षल पटेल प्रमाणेच आवेश खान सुद्धा जखमी झाला आहे. हर्षल आणि आवेशच्या दुखापती मध्ये फरक इतकाच आहे की, आवेश खानच्या मनाला दुखापत झाली आहे. हर्षल पटेल त्याच्या दुखापतीमधून सावरेल. पण आवेश खानला स्वत:ला सिद्ध कराव लागणार आहे. रोहित शर्मामुळे आवेश खान जखमी झाला आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध दुसऱ्या टी 20 सामन्यात रोहितने शेवटच्या षटकात आवेशच्या हाती चेंडू सोपवला. ज्याचे गंभीर परिणाम त्याला भोगावे लागू शकतात.
आशिया कप आणि टी 20 वर्ल्ड कपसाठी संघात वेगवान गोलंदाजांनी निवड करणं, सोप नाहीय. प्रचंड चढा-ओढ आहे. म्हणूनच वेस्ट इंडिज विरुद्ध दुसऱ्या टी 20 सामन्यात रोहित शर्माने आवेश खानच्या हाती चेंडू सोपवणं ही एक प्रकारची परीक्षाच होती. ज्यात आवेश पास होऊ शकला नाही.
भारताला शेवटच्या षटकात 10 धावांचा बचाव करायचा होता. भुवनेश्वर कुमारची 2 षटकं बाकी होती. अशावेळी सर्वांना असं वाटलं की, रोहित शेवटच्या ओव्हरसाठी भुवनेश्वर कुमारच्या हाती चेंडू सोपवेल. पण त्याने आवेशच्या हातात चेंडू देऊन सर्वांनाच धक्का दिला.
आवेश खानच्या शेवटच्या षटकात अपेक्षित कामगिरी करु शकला नाही. वेस्ट इंडिजला विजयासाठी आवश्यक असलेल्या 10 धावा द्यायच्या नव्हत्या. त्याच दबावाखाली आवेशने पहिलाच चेंडू नो बॉल टाकला. वेस्ट इंडिजला फ्री हिट मिळाला. त्या चेंडूवर एक षटकार बसला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला. अशा प्रकार पहिल्या दोन चेंडूतच वेस्ट इंडिजने 10 धावा करुन सामना जिंकला.
या प्रदर्शनानंतर आवेश खानची आशिया कप आणि टी 20 वर्ल्ड कपसाठी संघात निवड होणं मुश्किल आहे. कारण त्याला अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेल यांच्या आव्हानाचा सामना करावा लागेल. रोहित शर्माने सामन्यानंतर जे वक्तव्य केलं, त्यावरुन प्रत्येक खेळाडूची अंतिम परीक्षा होतेय, जो सरस ठरेल, त्यालाच टी 20 वर्ल्ड कप संघात स्थान मिळणार, असं दिसतय.
.@Avesh_6‘s untimely no-ball served perfectly for Windies, and #DevonThomas hit a stylish four to secure the win!
Watch the India tour of West Indies LIVE, exclusively on #FanCode ? https://t.co/RCdQk1l7GU@BCCI @windiescricket#WIvIND #INDvsWIonFanCode #INDvsWI pic.twitter.com/toZ2wgKrkX
— FanCode (@FanCode) August 1, 2022
भुवनेश्वर असतानाही रोहितने आवेश खानच्या हाती चेंडू सोपवला, त्यावर तो म्हणाला की, “आम्ही भुवनेश्वर कुमारला रन्स डिफेंड करताना पाहिलं आहे. तो हे करु शकतो. पण आम्ही आवेश खान, अर्शदीप सिंह सारख्या गोलंदाजांची चाचपणी करणार नाही, तर आम्हाला त्यांची क्षमता कशी कळणार?”