ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू घाबरले, पाकिस्तान दौरा रद्द होणार?

| Updated on: Jan 26, 2022 | 9:28 PM

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ (Australia cricket team) लवकरच पाकिस्तानचा दौरा (Pakistan tour) करणार आहे. पण या दौऱ्यावर जाण्याविषयी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू साशंक आहेत.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू घाबरले, पाकिस्तान दौरा रद्द होणार?
पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यातील एक क्षण
Follow us on

लाहोर: ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ (Australia cricket team) लवकरच पाकिस्तानचा दौरा (Pakistan tour) करणार आहे. पण या दौऱ्यावर जाण्याविषयी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू साशंक आहेत. पाकिस्तानात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमुळे (Terror Attack) त्यांच्या मनात भीतीची भावना आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ऑस्ट्रेलियन संघाने 1998 पासून एकदाही पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. उलट त्रयस्थ ठिकाणी संयुक्त अरब अमिरातीमध्ये पाकिस्तान बरोबर मालिका खेळली आहे.

वेळापत्रकानुसार, तीन मार्चपासून ऑस्ट्रेलियाच्या पाकिस्तान दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलियन संघ तीन कसोटी, तीन एकदिवसीय आणि एक ट्वेंटी सामना खेळणार आहे. पाकिस्तानात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमुळे खेळाडूंच्या मनात भीतीची भावना आहे, असे सिडनी मॉर्निंग हेराल्डने वृत्त दिलं आहे.

पाकिस्तानात ऑस्ट्रेलियन संघाच्या सुरक्षेची अत्यंत मजबूत व्यवस्था करण्यात आली आहे, असे सिलेक्टर जॉर्ज बेली यांनी सांगितले. “पाकिस्तान दौऱ्यासंबंधीच्या अत्यंत छोट्यात छोट्या बारकाव्यावर बोर्ड काम करत आहे. एकदा बोर्डाकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर आम्ही संघाची घोषणा करु” असे जॉर्ज बेली यांनी म्हटलं.

अलीकडच्या काही वर्षात अन्य संघांनी पाकिस्तानचे दौरे केले आहेत. सुरक्षेच्या मुद्यावरुन न्यूझीलंडने सप्टेंबरमधील नियोजित पाकिस्तान दौरा स्थगित केला होता. इंग्लंडनेही आपला दौरा रद्द केला होता. अफगाणिस्तानात तालिबान सत्तेवर आल्यानंतर पाकिस्तानात दहशतवादी हल्ले पुन्हा वाढले आहेत. अफगाणिस्तानातून अमेरिकेने काढता पाय घेतल्यानंतर पाकिस्तानता दहशतवादी हल्ले वाढल्याचे पाकिस्तानचे अंतर्गत मंत्री शेख राशिद यांनी सांगितले.