T20 World Cup: हार्दिक पंड्याने खेळावं का?, दिग्गजांचं म्हणणं काय?

| Updated on: Oct 29, 2021 | 5:24 PM

मागील काही काळापासून ऑलराउंडर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) खास कामगिरी करत नसल्याचं दिसून येत आहे. एकेकाळी एकट्याच्या जीवावर सामना जिंकवणारा हार्दीक अलीकडे मात्र आऊट ऑफ फॉर्म असल्याचं दिसतं आहे.

1 / 5
हार्दिक पंड्या मागील काही काळापासून दुखापतीमुळे ग्रस्त आहे. तो गोलंदाजीही करत नसल्याने संघातील त्याचं स्थानहील धोक्यात आलं आहे. आता आगामी न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात तो गोलंदाजी करणार अशी बातमी समोर येत आहे. मात्र आतापर्यंतच्या त्याच्या कामगिरीमुळे भारतीय क्रिकेटमधील दिग्गजांचं त्याच्याबद्दलचं मत काय आहे, ते पाहूया...

2 / 5
भारताचे माजी खेळाडू आणि निवडकर्ता संदीप पाटील यांनी पंड्याच्या बाबतीत निवडकर्त्यांना सुनवलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना ते म्हणाले,"अंतिम 11 मध्ये कोण खेळणार याची निवड कर्णधार आणि निवडकर्तेच करतात. त्यात पंड्या मागील काही दिवसांपासून गोलंदाजी करत नसतानाही त्याला संघात स्थान दिलं जात आहे. किमान त्याची फिटनेस टेस्ट होणे गरजेचे होते."

3 / 5
भारताचे माजी गोलंदाज आणि मुंबई क्रिकेट संघाचे  (एमसीए) मुख्य निवडकर्ता सलील अंकोला यांनीही पंड्याबद्दल आपलं मत माडलं.  टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना ते म्हणाले,"जर पंड्या गोलंदाजी नसेल करत तर तो कोणत्याच टीममध्ये फिट बसत नाही. ज्यालाही क्रिकेटबद्दल थोडंही कळंत तो हार्दीकच्या जागी शार्दूलला संघात स्थान देईल.''

4 / 5
भारताचे माजी क्रिकेटपटू  दिलीप दोषी यांनी पंड्याबद्दल बोलताना म्हणाले की,'काही खेळाडू त्यांच्या भूतकाळातील प्रदर्शनाच्या जोरावर खेळतात. पण भूतकाळाप्रमाणे त्यांनी आताही चांगलं काम करणं अपेक्षित आहे. यावेळी त्यांनी भुवनेश्वरचंही नाव घेतलं.''

5 / 5
भारताचे माजी क्रिकेटपटू आणि मुख्य निवडकर्ते दिलीप वेंगसरकर टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाले, ''पंड्याच्या खेळण्याबाबत फिजीओ आणि संघ व्यवस्थापनच योग्य तो निर्णय घेतील.''