पत्नीची परवानगी घेऊन या माजी क्रिकेटरने 28 वर्ष लहान तरुणीशी केला दुसरा विवाह

| Updated on: Feb 01, 2024 | 2:34 PM

Second marriage : दुसरा विवाह करणे आता काही मोठी गोष्ट उरलेली नाही, अनेकांनी दोन लग्न केले आहेत. पहिला संसार मोडल्यामुळे अनेकांनी दुसरा लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये आणखी एका भारतीय क्रिकेटरची भर पडली आहे. कोण आहे ते माजी भारतीय क्रिकेटर जाणून घ्या.

पत्नीची परवानगी घेऊन या माजी क्रिकेटरने 28 वर्ष लहान तरुणीशी केला दुसरा विवाह
Follow us on

नवी दिल्ली : सेलिब्रिटींनी दुसरा विवाह करणे ही काय आता मोठी गोष्ट राहिलेली नाही. अनेकांना पहिला संसार मोडल्यानंतर दुसरा विवाह केला आहे. पण यात काही भारतीय क्रिकेटर देखील आहेत ज्यांनी दोन विवाह केलेत. नुकताच सानिया मिर्झाचा पहिला पती शोएब मलिक याने देखील तिसरा विवाह केला आहे. पण अनेक भारतीय क्रिकेटर देखील आहेत ज्यांनी दुसरा विवाह केलाय. ज्यामध्ये विनोद कांबळी, जवागल श्रीनाथ, मोहम्मद अझरुद्दीन, योगराज सिंग, दिनेश कार्तिक यांचा समावेश आहे. पण आज तुम्हाला आम्ही अशा क्रिकेटरबद्दल सांगणार आहोत ज्यांनी दोन लग्न केले आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे दुसरी पत्नी २८ वर्षांनी लहान आहे.

कोण आहे तो माजी क्रिकेटर

माजी क्रिकेटर अरुण लाल यांनी दुसरा विवाह केला आहे. अरुण लाल यांनी 2022 मध्ये त्याच्यापेक्षा 28 वर्षांनी लहान मुलीशी लग्न केले होते. बुलबुल साह असे त्यांच्या पत्नीचे नाव आहे. दोघेही एकमेकांना अनेक दिवसांपासून जाणत होते. त्यानंतर पुढे त्यांनी विवाह करण्याचं ठरवलं. अरुण लाल यांच्या पहिल्या पत्नीचे नाव रीना लाल आहे. या दोघांचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. त्यामुळे अरुण लाल यांनी दुसरा विवाह करण्याचा निर्णय घेतला. पण या लग्नाआधी त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीकडून देखील समंती घेतली आहे.

हनीमूनसाठी प्रशिक्षकपदाचा राजीनामा?

अरुण लाल यांनी 2 जुलै 2022 रोजी बंगाल रणजी संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते हनीमूनसाठी गेले. बुलबुलने सांगितले की, त्यांच्यात सुरुवातीला कुठलेही प्रेम झाले नव्हते. ते एका पार्टीत भेटले होते. एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली होती.

क्रिकेट कारकिर्द

अरुण लाल यांनी क्रिकेटर म्हणून भारतासाठी 16 कसोटी सामने खेळले आहेत. याशिवाय 13 एकदिवसीय सामने देखील खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी 729 तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांनी 122 धावा केल्या आहेत. ९३ ही त्यांची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याच्या नावावर फक्त 1 अर्धशतक आहे.

अरुण लाल यांनी दुसरे लग्न केल्यानंतर ते चर्चेत आले होते. कारण त्यांची दुसरी पत्नी ही त्यांच्यापेक्षा तब्बल २८ वर्षांनी लहान आहे.