मुंबई: BCCI ने यावर्षी सुरु होणाऱ्या महिला IPL ची तयारी सुरु केलीय. सोमवारी लीग मीडिया राइट्सचा निर्णय झाला. वायकॉम 18 ने सर्वाधिक बोली लावून या लीगचे मीडिया राइट्स विकत घेतलेत. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी टि्वट करुन माहिती दिली. वायकॉम 18 ने 2023 ते 2027 दरम्यान 951 कोटी रुपयांची बोली लावूव राइट्स विकत घेतले. याचा अर्थ वायकॉम 18 प्रत्येक मॅचसाठी बीसीसीआयला 7.09 कोटी रुपये मोजणार आहे.
महिला आयपीएलच आयोजन कधी?
बीसीसीआयने 2022 मध्ये 2023 पासून महिला आयपीएल सुरु होणार असल्याची घोषणा केली होती. मीडिया राइट्स निश्चित झाले आहेत. 25 जानेवारीला महिला आयपीएलच्या पाच टीम्सची घोषणा होईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिला आयपीएलच आयोजन फेब्रुवारी-मार्च दरम्यान होऊ शकतं.
जय शाह काय म्हणाले?
जय शाह यांनी टि्वट करुन मीडिया राइट्सची माहिती दिली. “वायकॉम 18 ने मीडिया राइट्स मिळवले, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. बीसीसीआय आणि महिला टीमवर विश्वसा दाखवल्याबद्दल आभार. वायकॉम 18 ने 951 कोटी रुपयांची बोली लावली होती. म्हणजे पुढची पाच वर्ष प्रत्येक मॅचसाठी 7.09 कोटी रुपये मिळतील. महिला क्रिकेटसाठी हे महत्त्वाच पाऊल आहे” महिला आयपीएलशिवाय आयपीएलचे डिजिटल राइट्स या कंपनीकडे आहेत.
Congratulations @viacom18 for winning the Women’s @IPL media rights. Thank you for your faith in @BCCI and @BCCIWomen. Viacom has committed INR 951 crores which means per match value of INR 7.09 crores for next 5 years (2023-27). This is massive for Women’s Cricket ???
— Jay Shah (@JayShah) January 16, 2023
हा ऐतिहासिक क्षण
“खेळाडूंमधील वेतन समानतेनंतर आयपीएल मीडिया राइट्ससाठी बोली सुद्धा ऐतिहासिक क्षण आहे. भारतात महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी हे महत्त्वाच पाऊल आहे. प्रत्येक एजग्रुपच्या खेळाडूंचा यात सहभाग व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्न करु” असं जय शाह म्हणाले.
लवकरच होणार ऑक्शनच्या तारखांची घोषणा
बीसीसीआय 25 जानेवारीला पाच टीम्सची घोषणा करेल. आयपीएलच्या 10 टीम्सपैकी 8 टीम्सनी आयपीएल टीम विकत घेण्यात रस दाखवला. टीम निश्चित झाल्यानंतर खेळाडूंच ऑक्शन होईल. फेब्रुवारीच्या अखेरीस आणि मार्चच्या सुरुवातीला पहिला सीजन खेळला जाईल. ऑक्शनच्या तारखांची पण लवकरच घोषणा होईल.