T20 World Cup सेमीफायनलमध्ये हरलेल्या टीम इंडियाला Prize Money पोटी किती रक्कम मिळाली?

| Updated on: Feb 27, 2023 | 8:03 AM

T20 Womens World Cup : लेनिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने 2018 आणि 2020 मध्ये किताब जिंकला होता. फायनलमधील विजयानंतर ऑस्ट्रेलियाला विजेतेपदाची ट्रॉफी मिळालीच. पण त्याचबरोबर बक्षिसापोटी घसघशीत रक्कम सुद्धा मिळाली.

T20 World Cup सेमीफायनलमध्ये हरलेल्या टीम इंडियाला Prize Money पोटी किती रक्कम मिळाली?
t20 world cup winner australian team
Image Credit source: twitter
Follow us on

T20 Womens World Cup : ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा महिला T20 वर्ल्ड कपचा किताब जिंकलाय. रविवारी 26 फेब्रुवारीला मेग लेनिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन टीमने फायनलमध्ये यजमान दक्षिण आफ्रिकेला 19 धावांनी पराभूत केलं. ऑस्ट्रेलियाने महिला टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याची ही सहावी वेळ आहे. चॅम्पियनशिपसोबत ऑस्ट्रेलियाने टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याची हॅट्रिक केली. लेनिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने 2018 आणि 2020 मध्ये किताब जिंकला होता. फायनलमधील विजयानंतर ऑस्ट्रेलियाला विजेतेपदाची ट्रॉफी मिळालीच. पण त्याचबरोबर बक्षिसापोटी घसघशीत रक्कम सुद्धा मिळाली.

महिला टी 20 वर्ल्ड कपची फायनल जिंकून ऑस्ट्रेलियन टीमने झळाळत चषक उचललाच. पण त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाला इनामापोटी किती रक्कम मिळाली? याची उत्सुक्ता आहे. फक्त ऑस्ट्रेलियाच नाही उपविजेती टीम दक्षिण आफ्रिका, सेमीफायनलमध्ये पराभूत झालेल्या टीम इंडिया आणि इंग्लंडच्या टीमला सुद्धा चांगली रक्कम मिळाली.

चॅम्पियन ऑस्ट्रेलिया मालामाल

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आधीच महिला टी 20 वर्ल्ड कप 2023 साठी प्राइज मनीची घोषणा केली होती. या टुर्नामेंटमध्ये सहभागी झालेल्या सर्व 10 टीम्समध्ये एकूण 2.45 मिलियन डॉलर म्हणजे 20.31 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेचे वाटप करण्यात आलं. यात विजेतेपद मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियाला किती रक्कम मिळाली?

फायनलासाठी किती प्राइज मनी?

चॅम्पियनला टीम ऑस्ट्रेलियाला 1 मिलियन डॉलर म्हणजे 8.29 कोटी रुपये इनामी रक्कमेपोटी मिळाले. फायनलमध्ये हरलेल्या दक्षिण आफ्रिकेला 5 लाख डॉलर म्हणजे 4.14 कोटी रुपये मिळाले.

ग्रुप स्टेजसाठी इनामी रक्कम काय होती?

बक्षिसाची रक्कम इतकीच नाहीय, तर नियमानुसार, ग्रुप स्टेजमध्ये प्रत्येक मॅच जिंकणाऱ्या टीमला 17,500 डॉलर म्हणजे 14.51 लाख रुपये देण्यात आले. ऑस्ट्रेलियाने ग्रुप स्टेजमधील चारही सामने जिंकले. यासाठी त्यांना 1 मिलियन डॉलरशिवाय 70 हजार डॉलर म्हणजे 58 लाख रुपये इनामी रक्कमेपोटी मिळाले. म्हणजेच त्यांना एकूण 8.87 कोटी रुपये मिळाले.

टीम इंडिया सुद्धा कोट्यधीश

दक्षिण आफ्रिकेने ग्रुप स्टेजमध्ये तीन सामने जिंकले होते. त्यामुळे फायनलमधील उपविजेतेपदासाठी 4.14 कोटी रुपयांसह 43 लाख रुपये मिळतील. त्यांना एकूण 4.57 कोटी रुपये मिळाले. उपांत्य फेरीतील पराभवासाठी भारत आणि इंग्लंड दोन्ही टीम्सना एकसमान 1.74 कोटी रुपये मिळतील. भारताने ग्रुप स्टेजमध्ये 3 सामने जिंकले होते. यामुळे भारताला 43 लाख रुपये मिळतील. भारताच्या खात्यात इनामी रक्कमेपोटी एकूण 2.17 कोटी रुपये जमा होतील. इंग्लंडने एकूण चार सामने जिंकले होते. त्यामुळे त्यांना 2.32 कोटी रुपये मिळतील.