Womens World Cup 2022: भारत अडचणीत, सेमीफायनलमध्ये कसा पोहोचणार? जाणून घ्या गुणतालिकेचं गणित

| Updated on: Mar 16, 2022 | 2:16 PM

महिला विश्वचषक 2022 (Womens World Cup 2022) या स्पर्धेतील 15 व्या सामन्यात टीम इंडियाचा दारुण पराभव झाला. गतविजेत्या इंग्लंडने टीम इंडियाचा (England Women vs India Women) 4 विकेट्स आणि 112 चेंडू राखून पराभव केला. टीम इंडियाची (Team India) फलंदाजी फ्लॉप ठरली.

Womens World Cup 2022: भारत अडचणीत, सेमीफायनलमध्ये कसा पोहोचणार? जाणून घ्या गुणतालिकेचं गणित
IND W vs ENG W
Image Credit source: ICC TWITTER
Follow us on

मुंबई : महिला विश्वचषक 2022 (Womens World Cup 2022) या स्पर्धेतील 15 व्या सामन्यात टीम इंडियाचा दारुण पराभव झाला. गतविजेत्या इंग्लंडने टीम इंडियाचा (England Women vs India Women) 4 विकेट्स आणि 112 चेंडू राखून पराभव केला. टीम इंडियाची (Team India) फलंदाजी फ्लॉप ठरली. संघ अवघ्या 36.2 षटकांत 134 धावांत आटोपला. 135 धावांचं आव्हान इंग्लंडच्या महिला संघाने 6 गड्यांच्या बदल्यात 31.2 षटकात पूर्ण केलं. इंग्लंडविरुद्धचा सामना गमावणं टीम इंडियाला जड जाऊ शकतं. कारण टीम इंडियाचे अजून तीन साखळी सामने बाकी आहेत, पण समस्या अशी आहे की त्यांचे दोन सामने स्पर्धेतील सर्वोत्तम संघांसोबत होणार आहेत. भारतीय संघाने फॉर्मात नसलेल्या इंग्लंडला पराभूत केले असते, तर उपांत्य फेरी गाठण्याचा त्यांचा दावा बळकट झाला असता.

टीम इंडियाला उपांत्य फेरी गाठण्यासाठी संघर्ष का करावा लागू शकतो? हे जाणून घेण्याआधी पॉइंट टेबलची (गुणतालिकेची) स्थिती जाणून घेण्याची गरज आहे. ऑस्ट्रेलिया 4 पैकी 4 सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंतचे तिन्ही सामने जिंकले असून ते दुसऱ्या स्थानावर आहेत. 4 पैकी 2 सामन्यात विजय मिळवून 4 गुण आणि +0.632 च्या चांगल्या धावगतीमुळे भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजचेही 4-4 गुण आहेत आणि हे दोन्ही संघ चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.

उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारतीय संघाला काय करावे लागेल?

भारतीय संघाला उपांत्य फेरी गाठण्यासाठी सर्वोत्तम क्रिकेट खेळण्याची गरज आहे. भारताने पुढचे तिन्ही सामने जिंकले तर संघाचे 10 गुण होतील. पण असे झाले नाही तर त्यांना किमान 2 सामने कुठल्याही परिस्थितीत चांगल्या फरकाने जिंकावेच लागतील. यासोबत नेट रनरेटचीही काळजी घ्यावी लागेल. मात्र, इथे अडचण अशी आहे की टीम इंडियाला आपला पुढचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचा आहे, जो संघ अजूनही स्पर्धेत अजिंक्य आहे. यानंतर टीम इंडियाला कमकुवत बांगलादेशचा सामना करावा लागणार आहे. जो सामना भारत जिंकेल असं आपण मानू शकतो. पण शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे. अशा स्थितीत भारतासाठी दोन सामने आव्हानात्मक असून या दोन्ही सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला तर उपांत्य फेरी गाठण्याच्या त्यांच्या आशा संपुष्टात येतील.

न्यूझीलंड-वेस्ट इंडिजकडून मोठा धोका

न्यूझीलंडचेही 3 सामने बाकी आहेत. त्यांना पुढील सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि पाकिस्तानचा सामना करावा लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ न्यूझीलंडला चांगलं आव्हान देऊ शकतो पण हा संघ इंग्लंड आणि पाकिस्तानला हरवू शकतो. इंग्लंडचा संघ नक्कीच मजबूत आहे पण त्यांची लय कुठेतरी हरवलेली दिसते.

वेस्ट इंडिजचेही तीन सामने बाकी आहेत, त्यापैकी दोन सामने त्यांच्यासाठी सोपे म्हणता येतील. विंडीजला या स्पर्धेतील सर्वात कमकुवत संघ असलेल्या बांगलादेश आणि पाकिस्तानचा सामना करावा लागणार आहे. जर त्यांनी हे दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकले तर त्यांची निव्वळ धावगती (नेट रनरेट) अधिक चांगली होईल. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव झाला तरी हा संघ भारतापेक्षा वरचढ राहू शकतो. इंग्लंडबद्दल बोलायचे तर त्यांना पुढचे तिन्ही सामने जिंकावे लागतील, तरच ते 8 गुणांपर्यंत पोहोचू शकतील. जर इंग्लंडने ही कामगिरी केली तर उपांत्य फेरीतील संघ निव्वळ धावगतीच्या आधारावर म्हणजेच नेट रनरेटच्या जोरावर ठरवले जातील.

इतर बातम्या

आयपीएलमध्ये कोणीच घेतलं नाही, हनुमा विहारीसह 7 भारतीय खेळाडूंनी धरली बांगलादेशची वाट

IPL 2022: आयपीएल खेळण्याआधी 10 षटक टाकून दाखवं, BCCI, NCA कडून हार्दिक पंड्याला चॅलेंज

IPL 2022: खबरदार! बायो बबल मोडल्यास बंदीपासून ते कोट्यवधीचा दंड, वाचा BCCI चे अद्दल घडवणारे नियम