रिलायन्स इंडस्ट्रीचे संस्थापक धीरूभाई अंबानी हे देशातील मोठे उद्योजक होते. दहावीनंतर शाळा अर्धवट सोडलेली, एका पेट्रोल पंपवर नोकरी करत धीरूभाईंनी मोठं साम्राज्य उभं केलं. हा प्रवास काही सोपा नव्हता, एका उद्योजकाला जर यशस्वी व्हायचं असेल तर संधी ओळखता यायला हव्यात. धीरूभाई अंबानी यांनीही अशीच एक संधी हेरली अन् रिलायन्सला जगभरात ओळख मिळवून दिली होती. ही गोष्ट आहे 1987 च्या वर्ल्ड कपची, भारताने 1983 साली वर्ल्ड कपवर पहिल्यांदा नाव कोरलं होतं. त्यानंतर बीसीसीआयने पुढच्या वर्ल्ड कपचं यजमानपद घेतलं. यजमानपद घेतलं खरं पण अंगाशीच आल्यासारखं झालं होतं. मात्र धीरूभाई यांनी पुढाकार घेतल्याने बीसीसीआयची जगभरात प्रतिमा राखली गेली. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं. इंग्लंडनंतर वर्ल्ड कपचं बाहेर आयोजन भारताने क्रिकेट वर्ल्ड कपवर 1983 साली कपिल देव यांच्या नेतृत्त्वाखाली नाव कोरलं होतं. वेस्ट इंडिजसारख्या बलाढ्य संघाला भारत पराभूत करेल असा विचारही कोणी केला नव्हता. वर्ल्ड कप जिंकल्यावर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेटची क्रेज वाढली. बीसीसीआयने पुढच्या वन डे वर्ल्ड कपचं यजमानपद...