World Cup 2023: असं झाल्यास भारतात नाही होणार वर्ल्ड कप 2023! ICC आणि BCCI मध्ये वाद

| Updated on: Dec 18, 2022 | 7:38 AM

आयसीसी वर्ल्ड कप 2023 टुर्नामेंट भारतात होणार आहे. पण आता या स्पर्धेच आयोजन धोक्यात आलं आहे. याबद्दल वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत.

World Cup 2023:  असं झाल्यास भारतात नाही होणार वर्ल्ड कप 2023! ICC आणि BCCI मध्ये वाद
World cup 2023
Follow us on

World Cup 2023 India BCCI ICC: आयसीसी वर्ल्ड कप 2023 टुर्नामेंट भारतात होणार आहे. पण आता या स्पर्धेच आयोजन धोक्यात आलं आहे. भारतात आयोजित होणाऱ्या वर्ल्ड कप 2023 स्पर्धेसाठी आयसीसीला टॅक्समध्ये सवलत हवी आहे. यासाठी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाला भारत सरकारशी चर्चा करावी लागेल. भारत सरकार देशात होणाऱ्या अशा स्पर्धांसाठी टॅक्समध्ये सवलत देत नाहीत. याआधी 2016 वर्ल्ड कप आयोजनाच्यावेळी सुद्धा बीसीसीआयला या अडचणीचा सामना करावा लागला होता.

2016 वर्ल्ड कपच्यावेळी सवलत मिळाली होती का?

वर्ल्ड कप 2023 स्पर्धेच्या आयोजनासाठी आयसीसीला टॅक्समध्ये सवलत हवी आहे. त्यासाठी आयसीसीने बीसीसीआयला सरकारसोबत चर्चा करायला सांगितली आहे. बीसीसीआयला यासाठी भारत सरकारला खास विनंती करावी लागेल. याआधी 2016 साली टी 20 वर्ल्ड कप भारतात झाला. त्यावेळी सुद्धा बीसीसीआयला टॅक्समध्ये सवलत मिळाली नव्हती. त्यावेळी बीसीसीआयला आयसीसीला 190 कोटी रुपये द्यावे लागले होते. बीसीसीआयच आर्थिक नुकसान झालं होतं. आता पुन्हा एकदा तशीच स्थिती निर्माण झालीय.

अशा स्थितीत भारतात नाही होणार वर्ल्ड कप

आयसीसीच्या नियमानुसार, वर्ल्ड कपच आयोजन करणाऱ्या देशाला आपल्या सरकारसोबत चर्चा करुन टॅक्समध्ये सवलत मिळवून द्यावी लागते. टी 20 वर्ल्ड कप 2016 मध्ये बीसीसीआयला या अडचणीचा सामना करावा लागला होता. आता पुन्हा एकदा त्यांच्यासमोर टॅक्सचा मोठा प्रश्न आहे. बीसीसीआयला टॅक्समध्ये ही सवलत मिळाली नाही, तर त्यांना आयसीसीला 900 कोटी रुपये द्यावे लागतील. टॅक्सचे पैसे न दिल्यास, भारताला वर्ल्ड कपच्या यजमानपदावर पाणी सोडावं लागू शकतं. अजून या बद्दल कुठलही अधिकृत वक्तव्य समोर आलेलं नाही.