मुंबई : अगदी काही तासांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात (World Test Championship Final 2021) भारताची गाठ पडणार आहे न्यूझीलंडशी… (India vs New Zealand) ज्या न्यूझीलंडने 2019 साली झालेल्या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारताला पराभवाचा धक्का दिला आणि करोडो भारतीयांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला त्याच किवींच्या चमूशी आता भारताला भिडायचं आहे. ही लढत साऊथॅम्प्टनच्या हॅम्पशायर बाऊलच्या क्रिकेट ग्राऊंडवर खेळविण्यात येतीय. या लढतीत भारताला 2019 च्या वर्ल्ड कपमधल्या पराभवाचा बदला घेण्याची नामी संधी आहे. 2013 पासून भारतीय संघाला आयसीसीचा पुरस्कार जिंकता आलेला नाहीय. आता विराटच्या नेतृत्वाखालील संघाला साऊथॅम्प्टनच्या हॅम्पशायर बाऊलच्या बाल्कनीत जग्गजेतेपदाची गदा उंचावण्याची संधी आहे. (World Test Championship Final 2021 Will Team India avenge the World Cup semi final 2019)
2019 चा वर्ल्डकप मध्ये शानदार प्रदर्शन करून भारतीय संघाने सेमी फायनल मध्ये जागा मिळवली होती. फक्त दोन मॅच खेळायच्या आणि आयसीसीच्या जगज्जेतेपदाच्या करंडक उंचवायचा हे स्वप्न विराट कोहलीने पाहिलं होतं. परंतु विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने सेमी फायनलच्या सामन्यात भारताचा धुव्वा उडवला.
महेंद्रसिंग धोनीची क्रिकेट करियर मधली ही शेवटची मॅच ठरली. धोनी यानंतर निळ्या जर्सी मध्ये खेळलेला दिसलाच नाही शेवटी त्याने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुड बाय केलं.
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान ही मॅच 9 जुलै 2019 ला मॅंचेस्टर येथे खेळली गेली. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना आठ विकेट गमावून 239 धावा केल्या. संघाचा अनुभवी फलंदाज रॉस टेलर 90 चेंडूंमध्ये तीन चौकार आणि एका षटकारासह मदतीने 74 धावा केल्या तर केन विल्यमसनने 95 चेंडूत 67 जणांची खेळी केली. या खेळीला त्याने सहा चौकारांचा साज चढवला. भारताकडून भुवनेश्वर कुमारने 3 विकेट घेतल्या. न्यूझीलंडने केलेला स्कोर काही मोठा नव्हता. परंतु सामन्यादरम्यान थोडासा पाऊस पडून गेला आणि हाच या मधला टर्निंग पॉइंट ठरला.
भारताला या स्कोरचा पाठलाग करणं मुश्किल होऊन बसलं. भारताने आपल्या तीन विकेट्स फक्त 5 धावांवर गमावल्या. यानंतर 92 रुग्णांवर सहा विकेट गेल्या. नंतर रवींद्र जडेजा आणि एम एस धोनीने सामना शेवटपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय संघाचा 18 रन्सने या मॅचमध्ये पराभव झाला. या सामन्यात भारताकडून जडेजाने सर्वाधिक 77 रन्स केले. 59 बॉल मध्ये त्याने चार षटकार आणि चार चौकार लगावले. याशिवाय महेंद्रसिंग धोनीने 72 बॉलमध्ये एक चौकार आणि एका षटकारासह मदतीने 50 धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून मॅट हेन्री याने भारतीच्या 3 फलंदाजांना तंबूत पाठवलं.
(World Test Championship Final 2021 Will Team India avenge the World Cup semi final 2019)
हे ही वाचा :