WPL 2023 : Harmanpreet Kaur ने एकाचवेळी 5 बॉलर्सच बिघडवलं रिपोर्ट कार्ड, एकी विरुद्ध 400 च्या स्ट्राइक रेटने धावा

| Updated on: Mar 06, 2023 | 11:29 AM

WPL 2023 : गुजरात जायंट्स विरुद्ध महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात हरमनप्रीत कौरने 22 चेंडूत अर्धशतक झळकावलं. लीगमध्ये अर्धशतक झळकवणारी ती पहिली खेळाडू बनली आहे. WPL 2023 च्या पहिल्याच सामन्यात खेळताना काल Harmanpreet Kaur ने स्फोटक बॅटिंगच प्रदर्शन केलं.

WPL 2023 : Harmanpreet Kaur ने एकाचवेळी 5 बॉलर्सच बिघडवलं रिपोर्ट कार्ड, एकी विरुद्ध 400 च्या स्ट्राइक रेटने धावा
harmanpreet kaur
Image Credit source: wpl
Follow us on

Harmanpreet Kaur : WPL 2023 ची धमाकेदार सुरुवात झाली आहे. यात हरमनप्रीत कौरची भूमिका महत्त्वाची राहिली. हरमनप्रीत मुंबई इंडियन्ससाठी कॅप्टन इनिंग खेळली. हरमनप्रीतच्या शानदार फलंदाजीमुळे दोन उद्देश साध्य झाले. एक म्हणजे मुंबई इंडियन्स टीमला मोठा विजय मिळाला, दुसरं WPL लीगला ज्या धमाकेदार सुरुवातीची अपेक्षा होती, तशी टुर्नामेंटची सुरुवात झाली. हरमनप्रीत कौर वूमेन्स प्रीमियर लीगमध्ये हाफ सेंच्युरी झळकवणारी पहिली खेळाडू ठरली आहे.

गुजरात जायंट्स विरुद्ध काल वूमेन्स प्रीमियर लीगमधला पहिला सामना झाला. या मॅचमध्ये हरमनप्रीतने फक्त 22 चेंडूत अर्धशतक झळकवल. त्यानंतर ती आणखी 8 चेंडू खेळली. पूर्ण इनिंगमध्ये हरमनप्रीत कौरने 30 चेंडूंचा सामना करताना 65 धावा फटकावल्या.

5 गोलंदाजांची धुलाई

संपूर्ण मॅचमध्ये हरमनप्रीत कौरच्या बॅटिंगचा स्ट्राइक रेट 216 पेक्षा जास्त होता. गुजरात जायंट्सच्या 5 बॉलर्स विरोधात तिने जोरदार बॅटिंग केली. या पाच जणींच्या गोलंदाजीवर तिने खोऱ्याने धावा लुटल्या. भरपूर धुलाई केली.

400 च्या स्ट्राइक रेटने फटकेबाजी

हरमनप्रीत कौरने गुजरातच्या 5 बॉलर्सचा सामना केला. तिने या पाच बॉलर्समध्ये मोनिका पटेलची चांगलीच धुलाई केली. मोनिकाच्या प्रत्येक चेंडूवर हरमनप्रीत कौरने चौकार मारला. 400 च्या स्ट्राइक रेटने तिने 16 धावा केल्या.

कोणा विरुद्ध कितीच्या स्ट्राइक रेटने धावा?

जॉर्जिया वेयरहम विरोधातही तिने फटकेबाजी केली. तिने जॉर्जिया विरोधात 250 च्या स्ट्राइक रेटने 10 धावा केल्या. एश्ले गार्डनर विरोधात हरमनप्रीत कौरने 214.3 च्या स्ट्राइक रेटने 7 चेंडूत 15 धावा केल्या. सदरलँड विरुद्ध तिने 180 च्या स्ट्राइक रेटने 9 रन्स केल्या. स्नेह राणा विरुद्ध 150 च्या स्ट्राइक रेटने 15 धावा केल्या. काल पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सवर शानदार विजय मिळवला. मुंबईने गुजराला 143 धावांच्या फरकाने पराभूत केलं.