मुंबई : महिला प्रीमियर लीगची ( WPL ) लवकरच सुरुवात होणार आहे. लिलावात ( WPL Auction ) महिला खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लावण्यात आली. या लिलावातील सर्वात महागडी खेळाडू ठरली ती स्मृती मानधना. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 3.40 कोटी रुपयांना विकत घेतले. सर्वात महागड्या पहिल्या पाच खेळाडूंच्या यादीत 3 भारतीय खेळाडू आहेत. या यादीत एक ऑस्ट्रेलियन खेळाडूही आहे.
आयपीएलमध्येही करोडो रुपयांची बोली लावून खेळाडू खरेदी केले जातात. पण तुम्हाला माहीत आहे का की, या खेळाडूंना जेवढ्या पैशांत खरेदी केले जाते, तेवढे पैसे त्यांना मिळत नाहीत.
खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लावली जाते. पण त्यांच्या खात्यात किती रुपये जमा होतात हे कदाचित तुम्हाला माहित नसेल. खेळाडूंवर बोली लावलेल्या किंमतीतून किती रुपये वजा केले जातात आणि त्यांना किती रुपये मिळतात.
आयपीएल किंवा इतर लीगमध्ये जेव्हा जेव्हा लिलावाची किंमत मिळते तेव्हा त्यातून टीडीएस कापला जातो. भारतीय खेळाडूंना देय रकमेच्या 10% वर TDS कापला जातो. यानंतर, तुम्हाला आयकराच्या नियमांनुसार कर देखील भरावा लागेल, जो तुमच्या वार्षिक उत्पन्नावर अवलंबून आहे. निव्वळ उत्पन्नानंतर, यामध्ये अधिक कर भरावा लागू शकतो, टीडीएसची गणना लिलावाच्या पैशाच्या आधारे केली जाते.
पूर्ण पैसे मिळतात का?
लिलाव ही आधारभूत किंमत असते, त्यानंतर कंपन्यांचे खेळाडूंसोबत वेगवेगळे करार असतात. यामध्ये सामन्यांची संख्या, किती सामने खेळायचे किंवा कोणत्या आधारावर पैसे मिळणार आदी माहिती लिहिली जाते. त्या आधारे खेळाडूंना कराव्यतिरिक्त पैसे मिळतात. मग त्या निव्वळ उत्पन्नाच्या आधारे आयकर भरावा लागतो.
परदेशी खेळाडूंसाठी काय नियम आहेत?
परदेशी खेळाडूंना भारतात मिळणाऱ्या उत्पन्नाच्या 20 % टीडीएस भरावा लागतो. विदेशी खेळाडूंना TDS व्यतिरिक्त कोणताही कर भरावा लागत नाही. त्यांना भारतात मिळणाऱ्या उत्पन्नावरच कर भरावा लागतो.