WTC Final 2023 : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी टीम इंडिया गटागटाने लंडनमध्ये दाखल होणार आहे. हेड कोच राहुल द्रविड संपूर्ण कोचिंग स्टाफसह 23-24 मे दरम्यान लंडनला रवाना होतील. आयपीएल 2023 च्या प्लेऑफ शर्यतीतून बाहेर होणारे खेळाडू द्रविड यांच्यासोबत लंडनला जाऊ शकतात. अन्य खेळाडू आयपीएल संपल्यानंतर टीमला जॉइन करतील. कॅप्टन रोहित शर्मा आणि अन्य खेळाडू 1 जूनपासून इंग्लंडमध्ये पूर्णपणे सराव सुरु करतील.
“राहुल मे च्या शेवटच्या आठवड्यात 23-24 मे दरम्यान लंडनला रवाना होईल. आयपीएलमधील कमिटमेंट संपल्यानंतर अन्य प्लेयर्स इंग्लंडला जातील. आयपीएलमधील आव्हान आधीच संपुष्टात आल्यास काही खेळाडू द्रविड यांच्यासोबत रवाना होऊ शकतात” असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्ट्सला सांगितलं.
श्रेयस अय्यरच्या जागी कोणाला संधी?
चेतेश्वर पुजारा अंतिम टप्प्प्याची तयारी सुरु असताना, टीमला जॉइन करु शकतो. सध्या तो इंग्लंडमध्ये ससेक्स काऊंटीकडून खेळतोय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी मे च्या पहिल्या आठवड्यात टीम निवडली जाणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिकेसाठी निवडण्यात आलेली टीम जवळपास कायम राहिल. श्रेयस अय्यरच्या जागी कोणाला निवडायच, याचा निर्णय निवड समितीला घ्यावा लागणार आहे. सूर्यकुमार यादवकडे इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेट खेळण्याचा पुरेसा अनुभव नाहीय. निवड समिती श्रेयसच्या जागी अजिंक्य रहाणेची निवड करु शकते.
टीम इंडियाला त्याच्या निवडीचा भरपूर फायदा
मागच्यावर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दौऱ्यानंतर अजिंक्य राहणेला टीममधून वगळण्यात आलं. त्यानंतर फॉर्मसाठी अजिंक्यचा संघर्ष सुरु होता. सध्या अजिंक्य रहाणे आयपीएल 2023 मध्ये खोऱ्याने धावा करतोय. त्याशिवाय त्याच्याकडे टेस्ट क्रिकेट खेळण्याचा दीर्घ अनुभव आहे. याचा फायदा टीम इंडियाला होऊ शकतो.
त्याला सिलेक्शन कमिटीने काय सूचना केलीय?
सिलेक्टर्सनी अजिंक्यला लाल बॉलने सराव करण्याची सूचना केली आहे. सूर्यकुमार आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतोय. अजूनही त्याला म्हणावा तसा सूर गवसलेला नाहीय. WTC फायनलमध्ये मुंबईच्या एका खेळाडूला वगळून दुसऱ्या खेळाडूला संधी मिळू शकते.