लंडन | ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल महामुकाबला खेळवण्यात येत आहे. या महामुकाबल्याचं आयोजन हे लंडनमधील द ओव्हलमध्ये करण्यात आलंय. ऑस्ट्रेलियाने सामन्याच्या चौथ्या दिवशी दुसरा डाव 270 धावांवर घोषित केला. ऑस्ट्रेलियाकडे दुसऱ्या डावात 173 धावांची आघाडी होती. त्यामुळे टीम इंडियाला विजायसाठी 444 धावांचं आव्हान मिळालं.
टीम इंडियाकडून 444 धावांचा पाठलाग करण्यासाठी शुबमन गिल आणि कॅप्टन रोहित शर्मा ही सलामी जोडी मैदानात आली. दोघांनी चांगली आणि सावध सुरुवात केली.दोघांनी 41 धावा जोडल्या. त्यानंतर मात्र सामन्यातील चौथ्या डावातील 8 वी ओव्हर स्कॉट बोलंड टाकायला आला.
स्कॉटच्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर शुबमन गिलच्या बॅटला कट लागून बॉल कॅमरुन ग्रीनच्या दिशेने देला. ग्रीनने संश्यास्पदरित्या कॅच पकडला. थर्ड अंपायरने शुबमन गिल याला आऊट दिलं. कॅमरुनने हा कॅच नीट पकडला नाही. बॉल जमिनीला टच झाला. त्यामुळे शुबमन नाबाद असल्याचं अनेकांचं मत आहे. मात्र त्यानंतरही थर्ड अंपायरने शुबमनला आऊट दिलं. त्यामुळे यावरुन वादाला तोंड फुटलंय.
नेटकऱ्यांनीही आणि क्रिकेट चाहत्यांनी या निर्णयावरुन नाराजी आणि संताप व्यक्त केलाय. इतरकंच काय तर शुबमनने ट्विट करत या निर्णयबाबत हैराणी व्यक्त केली. दरम्यान आता टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने अंपायरला या निर्णयावरुन शिव्या घातल्याचा दावा केला जात आहे.
रोहित शर्माच्या सोशल मीडिया पोस्टचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे. यामध्ये अंपायरला उद्देशून शिव्या दिल्या आहेत. मात्र रोहितने अंपायरला शिव्या दिल्याचा दावा हा खोटा आहे. रोहितने अंपायरला शिव्या दिलेल्या नाहीत. रोहितच्या नावाचं फेक अकाउंट आहे. त्यामुळे रोहितचा या सोशल मीडिया पोस्टशी संबंध नसल्याचं सिद्ध झालं आहे.
व्हायरल इंस्टा स्टोरी
Rohit Sharma's latest insta story. pic.twitter.com/ImdFi2tMLi
— Ishu (@PocketDynamoo) June 10, 2023
पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.
रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.