मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल जवळ आली आह. सात जूनला भारत आणि ऑस्ट्रेलियाची टीम आयसीसी टुर्नामेंटच्या फायनलमध्ये आमने-सामने असतील. आधी ऑस्ट्रेलियाने WTC फायनलसाठी टीम जाहीर केली. त्यानंतर BCCI ने आपला संघ निवडला. टीमची निवड जाहीर झाल्यानंतर काही दिवसातच IPL 2023 मध्ये खेळताना केएल राहुलला दुखापत झाली. राहुल फक्त आयपीएलच नाही, WTC साठी निवडलेल्या टीममधूनही बाहेर गेलाय.
सोमवारी बीसीसीआयने एक टीम जाहीर केली. यात केएल राहुलला हटवून त्याच्याजागी इशान किशनची टीममध्ये निवड करण्यात आली आहे. त्याशिवाय स्टँडबाय म्हणून इंग्लंडला जाणाऱ्या खेळाडूंची नाव सुद्धा जाहीर केली आहेत.
बीसीसीआयने ऐनवेळी दुसरं नाव केलं जाहीर
स्टँडबाय खेळाडू प्लेइंग इलेव्हनचा भाग नसतील. पण टीमसोबत असतील. एखाद्या खेळाडूला दुखापत झाली, तर ते टीमचा भाग बनतील. केएल राहुल WTC मध्ये खेळणार नाही, अशा बातम्या येत होत्या, त्यावेळी सर्फराज खानला त्याच्याजागी संधी मिळेल, असं बोललं जात होतं. पण बीसीसीआयने इशान किशनच नाव जाहीर केलय.
फर्स्ट क्लासमध्ये कशी आहे इशान किशनची कामगिरी?
इशान किशन आणि सर्फराज खान या दोन्ही प्लेयर्सनी टीम इंडियाकडून अजून टेस्ट डेब्यु केलेला नाहीय. इशान किशनला ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सीरीजसाठी निवडलं होतं, पण त्याला डेब्युची संधी मिळाली नाही. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये इशान किशनने 48 सामन्यात 82 इनिंगमध्ये बॅटिंग केली आहे. त्याच्या नावावर 2985 धावा आहेत. 273 ही इशान किशनची सर्वाधिक धावसंख्या आहे. त्याची सरासरी 38.76 आहे.
आकड्यांमध्ये सर्फराज सरस, एकदा नजर मारा
इशान किशनने 68.90 च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग केलीय. त्याच्या नावावर सहा सेंच्युरी आणि 16 हाफ सेंच्युरी आहेत. तेच सर्फराज खानने 37 सामन्यात 54 इनिंगमध्ये बॅटिंग केलीय. त्याच्या नावावर 3505 धावा आहेत. सर्फराजचा सर्वाधिक स्कोर नाबाद 301 आहे. 79.65 त्याची सरासरी आहे. 70.21 त्याचा स्ट्राइक रेट आहे. सर्फराज खानने आतापर्यंत 13 सेंच्युरी आणि नऊ हाफ सेंच्युरी झळकवल्या आहेत. आकड्यांबद्दल बोलायच झाल्यास, सर्फराज खान इशान किशनपेक्षा खूप पुढे आहे. मात्र, तरीही सिलेक्टर्सनी इशान किशनला संधी दिली.
इशानला संधी देण म्हणजे धोका पत्करण
इशान किशनची WTC फायनलसाठी निवडलेल्या टीममध्ये भले निवड झाली असेल, पण त्याला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. याआधी भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरीजमध्ये केएस भरतचा विकेटकीपर म्हणून टीममध्ये समावेश केला होता. त्यामुळे आताही केएस भरतला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. इशान किशनची बॅटिंग स्टाइल पाहता, त्याला ऑस्ट्रेलियासारख्या टीमसमोर थेट फायनलमध्ये उतरवण कुठल्या धोक्यापेक्षा कमी नाही.