WTC Final : ऑस्ट्रेलियन कॅप्टन पॅट कमिन्सने Rohit sharma च मत धुडकावलं, सरळ म्हणाला….

| Updated on: Jun 12, 2023 | 12:05 PM

WTC Final : रोहितला वाटतं, तस कमिन्सला अजिबात वाटत नाहीय. पराभवानंतर रोहित शर्मा कारणं शोधतोय. त्याला हा विचार मान्य नाहीय. कमिन्सने तसं स्पष्टपणे सांगितलं.

WTC Final : ऑस्ट्रेलियन कॅप्टन पॅट कमिन्सने Rohit sharma च मत धुडकावलं, सरळ म्हणाला....
Rohit Sharma-Pat cummins WTC Final 2023
Image Credit source: PTI
Follow us on

नवी दिल्ली : पराभव, पराभव आणि पराभव आयसीसी टुर्नामेंटमध्ये टीम इंडियाचा नुसता पराभवच झालाय. भारतीय क्रिकेट टीमने 2013 मध्ये शेवटची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर 9 आयसीसी टुर्नामेंट्समध्ये संधी गमावली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्येही टीम इंडियाचा पराभव झाला. या अपयशानंतर कॅप्टन रोहित शर्माने आयसीसीवरच प्रश्न निर्माण केलय. 2 वर्षापासून सुरु असलेल्या टुर्नामेंटचा विजेता कोण? हे फक्त एका सामन्याच्या आधारावर ठरवू नये.

रोहित शर्माच्या या मताशी ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स अजिबात सहमत नाहीय. त्याला हा विचार मान्य नाहीय. कमिन्सने तसं स्पष्टपणे सांगितलं.

पॅट कमिन्स काय म्हणाला?

“वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा एकमेव फायनल सामना खेळवण्यात काहीही चूकीच नाहीय. त्याने ऑलिंम्पिकच उदहारण दिलं. ऑलिम्पिकमध्ये एका शर्यतीतून गोल्ड मेडलचा निर्णय होतो. AFL, NRL मध्ये फायनल होतात. हा खेळ आहे” असं चॅम्पियन बनल्यानंतर पॅट कमिन्स म्हणाला.

पॅट कमिन्स एक गोष्ट विसरला

पॅट कमिन्स WTC फायनल जिंकल्यानंतर ऑलिम्पिकच उदहारण देतोय. पण कदाचित त्याला एका गोष्टीचा विसर पडलाय. त्याच्या देशात वनडे सीरीजच्या तिरंगी मालिकेत बेस्ट ऑफ थ्री फायनलच आयोजन होतं. ऑस्ट्रेलिया मायदेशात विजेता संघ एका फायनलवरुन ठरवत नाही. ते तीन अंतिम सामने खेळवतात.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचा फॉर्म्युला पूर्णपणे वेगळा आहे. ही टुर्नामेंट एकाचवेळी होत नाही. WTC सुरु असताना टीम्स वनडे आणि टी 20 सीरीज खेळतात. टीम इंडिया फायनल खेळण्याआधी दोन महिने त्यांचे प्लेयर आयपीलमध्ये व्यस्त होते.