WTC Final 2023 | इशान किशन की केएस भरत, कॅप्टन रोहित शर्मा विकेटकीपर म्हणून कुणाला खेळवणार?

| Updated on: May 09, 2023 | 7:06 PM

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 ते 11 जून दरम्यान लंडनमधील द ओव्हलमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलचा महामुकाबला रंगणार आहे. रोहित शर्मा या सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे.

WTC Final 2023 | इशान किशन की केएस भरत, कॅप्टन रोहित शर्मा विकेटकीपर म्हणून कुणाला खेळवणार?
Follow us on

मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमातील दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होऊन बरेच दिवस झाले आहेत. आता या मोसमाचा प्रवास शेवटाच्या दिशेने सुरु आहे. रायव्हलरी वीक सुरु झाल्याने प्रत्येक संघासाठी विजय महत्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येक संघात विजयासाठी चढाओढ पाहायला मिळत आहे. आयपीएल 16 व्या हंगामाची लगबग सुरु असली, तरी क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलकडे लागून राहिलं आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल खेळणार आहे. टीम इंडियाची ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशीप फायनल खेळण्याची दुसरी वेळ आहे. टीम इंडियाला 2021 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध फायनलमध्ये पराभव स्विकारावा लागला होता.

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात हा महामुकाबला होणार आहे. या महामुकाबल्याचं आयोजन इंग्लंडमधील द ओव्हरमध्ये करण्यात आलं आहे. हा सामना 7 ते 11 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. तर पावसामुळे काही गडबड झाल्यास सामन्यात व्यत्यय येऊ नये, यासाठी आयसीसीने खबरदारी घेतली आहे. आयसीसीने 12 जून हा राखीव दिवस ठेवला आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांची घोषणा झालीय. मात्र टीम इंडियाचे खेळाडू या सामन्याआधी दुखापतीने ग्रासले आहेत. उमेश यादव, जयदेव उनाडकट आणि शार्दुल ठाकूर आणि केएल राहुल या चौघांना दुखापतीने ग्रासलंय.

तर दुसऱ्या बाजूला विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल याला मांडीच्या दुखापतीमुळे आयपीएल 2023 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधून बाहेर व्हावं लागलंय. त्यामुळे बीसीसीआयने सोमवारी 8 मे रोजी केएल राहुल याच्या जागी इशान किशन याला संधी दिली. तर राखीव खेळाडू म्हणून सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड आणि मुकेश कुमार या तिघांना संधी दिलीय. त्यामुळे आता टीम इंडियाच्या मुख्य संघात केएस भरत आणि इशान किशन असे 2 विकेटकीपर बॅट्समन झाले आहेत. त्यामुळे आता कॅप्टन रोहित शर्मा या सामन्यात विकेटकीपर म्हणून या दोघांपैकी कुणाला संधी देणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

WTC Final साठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड आणि मुकेश कुमार

WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया

पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.