लंडन : ओव्हलमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा पहिला दिवस टीम इंडियासाठी कुठल्या झटक्यापेक्षा कमी नाहीय. हिरवागार पीच, आकाशात ढगांची दाटी आणि सकाळची हवा हे तीन घटक लक्षात घेऊन टीम इंडियाने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 15 मिनिटात ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट काढून टीमने दमदार सुरुवात केली. पण दिवसअखेरीस पहिल्या दिवसाच्या खेळावर ऑस्ट्रेलियाच वर्चस्व दिसून आलं. आता प्रश्न हा आहे की, दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा प्लान काय असेल? मॅचमध्ये पुनरागमन करण्यासाठी टीम इंडिया काय करणार?
बुधवारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने फक्त 3 विकेट गमावल्या आहेत. दुसऱ्यादिवशी दुसऱ्या सेशनच्या दुसऱ्या ओव्हरपर्यंत 3 बाद 76 धावा ऑस्ट्रेलियाची स्थिती होती. त्यानंतर ट्रेविस हेड आणि स्टीव स्मिथने 251 धावांची नाबाद भागीदारी केली. पहिल्या दिवस अखेर 3 बाद 327 ऑस्ट्रेलियाची स्थिती आहे. हेड आणि स्मिथमुळे टीम मजबूत स्थितीमध्ये आहे. सध्या कसोटीवर ऑस्ट्रेलियाची पकड दिसतेय.
आज सुरुवातीला एकच गोष्ट करावी लागेल
टीम इंडियाला आज दुसऱ्यादिवशी लवकर कसोटीवर नियंत्रण मिळवाव लागेल. अन्यथा विजेतेपदाचा स्वप्न भंग होऊ शकतं, ऑस्ट्रेलियाचे विकेट मिळवायचे असतील, टीम इंडियाला नव्या चेंडूने सुरुवात करावी लागेल. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या इनिंगमध्ये 90 ऐवजी 85 ओव्हर्सचा खेळ झाला. तिसऱ्या सेशनपर्यंत वेगवान गोलंदाजांना पीच आणि हवेकडून मदत मिळणं जवळपास बंद झालं होतं.
काल टीम इंडियाने तो पर्याय निवडला नव्हता
चेंडू जुना झालाय. पण पीच असा नाहीय की, त्यावर रिव्हर्स स्विंग किंवा स्पिन गोलंदाजांना मदत मिळेल. भारताने 80 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झाल्यानंतर नव्या चेंडूचा पर्याय निवडला नव्हता. गुरुवारी म्हणजे आज टीम इंडियाला नवा चेंडू घ्यावा लागेल. आज दुसऱ्यादिवशी सकाळी एक-दीडतास खेळपट्टीकडून मदत मिळू शकते. त्यावेळी टीम इंडियाला दबाव बनवता येईल.
तिसऱ्या सेशनमध्ये ऑस्ट्रेलियाने किती धावा केल्या?
या पीचवर विकेट मिळणं सोप नाहीय. स्मिथ आणि हेड विकेटवर सेट झालेत. तिसऱ्या सेशनमध्ये टीम इंडियाचे गोलंदाज धावगतीला लगाम घालू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सेशनमध्ये 34 ओव्हर्समध्ये 4.62 च्या सरासरीने 157 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाला किती धावांवर रोखाव लागेल?
टीम इंडियाला आज धावगतीला ब्रेक लावावा लागेल. असं झाल्यास विकेट मिळण्याची शक्यता आहे. शार्दुल ठाकूर आणि उमेश यादवने मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीची तितकी चांगली साथ दिली नाही. शार्दुलने 4 नो बॉल टाकले.
टीम इंडियाला आज ऑस्ट्रेलियाला 400-420 धावांच्या आसपास रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. असं झालं नाही, तर विजयाची शक्यता जवळपास संपुष्टात येईल.