Rohit Sharma, विराट पोहोचण्याआधीच बांग्लादेशमध्ये धमाका, ‘या’ 2 भारतीयांनी ठोकलं शतक

| Updated on: Nov 30, 2022 | 4:21 PM

कोण आहेत ते दोन भारतीय खेळाडू?

Rohit Sharma, विराट पोहोचण्याआधीच बांग्लादेशमध्ये धमाका, या 2 भारतीयांनी ठोकलं शतक
Century
Image Credit source: VideoGrab
Follow us on

ढाका: टीम इंडियाचा बांग्लादेश दौरा 4 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. पण त्याआधीच धमाका झालाय. बांग्लादेशला संदेश पोहोचलाय. हा, तर ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे. सिनियर टीम पोहोचल्यानंतर हा पूर्ण पिक्चर दिसेल. बांग्लादेश दौऱ्यासाठी रोहित, विराटसह टीम इंडियाचे सदस्य 1 डिसेंबरपर्यंत बांग्लादेशला पोहोचू शकतात. मात्र त्याच्या एकदिवस आधी इंडिया ए मधून बांग्लादेश दौऱ्यावर गेलेल्या यशस्वी जैस्वालने शतक ठोकलं. त्याच्याशिवाय इंडिया ए चा कॅप्टन अभिमन्यु ईश्वरनने सुद्धा शतक झळकावलं.

बांग्लादेशची टीम स्वस्तात आऊट

अनऑफिशिएल टेस्टमध्ये इंडिया ए ने बांग्लादेश ए टीमला फक्त 112 धावात गुंडाळलं. इंडिया ए साठी यशस्वी जैस्वाल आणि अभिमन्यु ईश्वरन ओपनिंग करण्यासाठी उतरले. त्यावेळी बांग्लादेश ए च्या गोलंदाजांना भारतीय ओपनर्सना रोखणं जमलं नाही. बांग्लादेश गोलंदाजीत काहीच दम नाहीय, असं दोघे खेळत होते. त्यांनी सहजतेने बॅटिंग केली.

बांग्लादेशमध्ये डेब्यु करताना यशस्वीच शतक

शतक प्रत्येक खेळाडूसाठी महत्त्वाच असतं. बांग्लादेश विरुद्ध शतक झळकावणं यशस्वी जैस्वालसाठी खास क्षण होता. कारण या मॅचमधून त्याने इंडिया ए साठी डेब्यु केला. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने आपला शानदार फॉर्म कायम ठेवला. त्याने 159 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. फर्स्ट क्लास क्रिकेटच्या 14 इनिंगमध्ये त्याच्या बॅटमधून निघालेलं हे सहावं शतक आहे.

अभिमन्युचा एंकर रोल

यशस्वीशिवाय अभिमन्यु ईश्वरनच्या शतकाचही कौतुक कराव लागेल. यशस्वीसोबत त्याची जोडी जमली. या पार्टनरशिपने एंकरचा रोल प्ले केला. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये हे त्याच 17 व शतक आहे. दोघांमध्ये विशाल भागीदारी झाली.

आता सिनियर खेळाडूंना संधी

टीम इंडियाच्या ए साइडने असा खेळ दाखवलाय, विचार करा, सिनियर खेळाडू तिथे काय करतील. कसोटी मालिका सुरु व्हायला अजून थोडा वेळ आहे. 4 डिसेंबरपासून वनडे सीरीज सुरु होणार आहे.