सौरव गांगुलीची मुलगी सना गांगुलीचा पगार ऐकून तुम्हाला ही धक्का बसेल

| Updated on: Apr 01, 2023 | 8:28 PM

सौरव गांगुलची मुलगी सना गांगुली सध्या तिला मिळत असलेल्या पगारामुळे चर्चेत आहे. सना गांगुली ही सध्या शिक्षण पूर्ण करत असून सोबत इंटर्नशिप देखील करत आहे.

सौरव गांगुलीची मुलगी सना गांगुलीचा पगार ऐकून तुम्हाला ही धक्का बसेल
Follow us on

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा ( BCCI ) माजी अध्यक्ष सौरव गांगुली ( Saurav Ganguly ) याची गणना भारताच्या सर्वोत्तम कर्णधारांमध्ये केली जाते. टीम इंडियासाठी अनेक महत्त्वाच्या सामन्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सध्या सौरव दिल्ली कॅपिटल्सच्या सपोर्ट स्टाफमध्ये आहे. मात्र सौरव गांगुलीसोबत त्याची मुलगी ( Saurav Ganguli daughter ) सध्या चर्चेत आहे. सौरव गांगुलीची मुलगी अचानक तिच्या पगारामुळे सोशल मीडियावर चर्चेत आलीये. सौरव गांगुलीची मुलगी आजकाल एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करत आहे आणि तिचा पगार ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

विशेष म्हणजे सौरव गांगुलीची मुलगी हिने खूप कमी वयात मोठे स्थान मिळवले आहे. सौरव गांगुलीसाठी ही खूप अभिमानाची बाब आहे. सौरव गांगुलीच्या मुलीचे नाव सना गांगुली ( Sana Ganguly ) आहे आणि ती लवकरच इंग्लंडच्या लंडन कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण करणार आहे. पण ग्रॅज्युएशन पूर्ण होण्याआधीच तिची कमाई लाखोंमध्ये होत आहे.

बारावीत ९८ टक्के मिळाले

सना गांगुलीचा वाचन आणि लेखनात अधिक रस आहे. तिने कोलकाता येथील लोरेटो हाऊस स्कूलमधून 12वी उत्तीर्ण केली आहे. तिला बारावीत ९८ टक्के गुण मिळाले होते. 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर सना लंडनला गेली आणि पुढील शिक्षणासाठी युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमध्ये प्रवेश घेतला. यादरम्यान सनाने अनेक कंपन्यांमध्ये काम केले आणि तिच्या क्षेत्रातील अनुभव मिळवला. सन 2008 मध्ये आर्थिक संकटावरही अभ्यास केला आहे.

सना गांगुलीने 2020 ते वर्ष 2022 पर्यंत इंटर्नशिप केली आहे, त्यानंतर तिने ICICI प्रुडेंशियल लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या भारतातील एक प्रमुख कंपनीमध्ये 23 महिन्यांची इंटर्नशिप केली आहे. याशिवाय, जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या PwC मध्ये देखील काम केले. सनाने जगातील सर्व मोठ्या कंपन्यांमध्ये योगदान दिले आहे. PwC मध्ये इंटर्नशिप दरम्यान, 30 लाख रुपये पगार मिळतो.