मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे युवा खेळाडूंचा श्रीलंका दौरा नुकताच संपला. भारतीय संघ व्यवस्थापन सर्व नव्या दमाचे खेळाडू घेऊन श्रीलंका दौऱ्यावर गेले होते. यावेळी एकदिवसीय मालिका 2-1 ने जिंकल्यानंतर टी-20 मालिकेपूर्वी मात्र भारतीय संघावर कोरोनाचे संकट कोसळले. अष्टपैलू कृणालला कोरोनाची बाधा झाल्यानंतर संघातील महत्त्वाच्या 7 खेळाडूंना देखील विलगीकरणात ठेवण्यात आलं. ज्यामुळे नवख्या खेळाडूंना सामन्यात पदार्पण करवून दुसरा आणि तिसरा टी-20 सामना खेळवला गेला. या खेळांडूमध्ये देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) याचाही समावेश होता.
दरम्यान पडिक्कल सामना खेळताना 21 वर्षे 21 दिवसांचा असल्याने तो अत्यंत कमी वयात संघात सहभागी होणाऱ्या खेळाडूसह 2000 सालानंतर जन्मलेला भारतीय वरिष्ठ संघात सहभागी होणारा पहिलाच खेळाडू ठरला असल्याचा दावा काही नेटकऱ्यांनी केला. ज्यावर इतर नेटकऱ्यांनी टीकास्त्र सोडत यापूर्वी भारतीय महिलांमध्ये शेफाली वर्मा, जेमिमा रॉर्डीग्स अशा 2000 सालानंतर जन्माला आलेल्या महिला क्रिकेटरही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्या आहेत, अशी कमेंट करत महिला क्रिकेटलाही योग्य मान देणे गरजेचे असल्याचे बोलून दाखवले.
Devdutt Padikkal becomes the first 21st centurion born Indian player to debut in international cricket.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 28, 2021
Please cross check facts. And mention men’s cricketer if you want to tweet. There’s women cricket as well and since you are so “passionate” about the sport, you can do better.
— Vishesh Roy (@vroy38) July 29, 2021
भारताने एकदिवसीय मालिकेदरम्यान पहिले दोन सामने सहज जिंकल्यानंतर तिसऱ्या सामन्यात जवळपास 5 खेळाडूंचे एकदिवसीय पदारर्पण करवत तिसरा सामना खेळला. ज्यामध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर टी-20 मालिकेवेळी पहिला सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यावेळी संघात कोरोनाचा शिरकाव झाल्याने महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती घ्यावी लागली. ज्यामुळे नव्या खेळाडूंना संधी देऊन एक नवा प्रयोग करण्यात आला. मात्र त्यानंतर दुसऱ्या सामन्यात 4 विकेट्सने आणि तिसऱ्या सामन्यात 7 विकेट्सने भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला ज्यामुळे मालिकाही हातातून निसटली.
इतर बातम्या
IND vs SL 3rd T20 Live : श्रीलंकेचा भारतावर दणदणीत विजय, टीम इंडियानं टी-20 मालिका गमावली
(Young Cricketer Devdutt Padikkal debut debate over women cricket on social media)