T20 World Cup 2021 मध्ये भारतीय संघात स्थान न मिळालेल्या चहलची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

| Updated on: Nov 17, 2021 | 9:52 PM

भारताने टी-20 विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात तीन मुख्य वेगवान गोलंदाज तर पाच फिरकीपटू होते. यामध्ये भारताच टी-20 स्पेशलिस्ट फिरकीपटू युझवेंद्र चहलला संधी देण्यात आली नव्हती.

T20 World Cup 2021 मध्ये भारतीय संघात स्थान न मिळालेल्या चहलची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
युझवेंद्र चहल
Follow us on

मुंबई : बीसीसीआयने (BCCI) यंदाच्या टी-20 विश्वचषकासाठी जाहीर केलेल्या संघात बरेच नवे बदल केले होते. पण यातील एक सर्वात मोठा बदल जो सर्वांसाठी धक्कादायक होता तो म्हणजे भारताचा अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra chahal) याला संधी देण्यात आली नव्हती. दरम्यान या स्पर्धेत भारताची कामगिरी फारच खराब ठरली. सेमीफायनलपूर्वीच भारत स्पर्धेबाहेर गेला. ज्यानंतर नेमकी काय चूक झाली? याचीच चर्चा सर्वत्र होती. त्यात अनेकांनी चहलला संधी न दिल्याने बराच तोटा झाल्याची प्रतिक्रियाही दिली होती. पण चहल अद्यापपर्यंत काहीच बोला नव्हता. पण अखेर त्याने मौन सोडलं असून आपली प्रतिक्रिया दिली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना चहल म्हणाला, “मागील काही वर्षात मी कायम संघात होतो. पण अचानक मला इतक्या मोठ्या स्पर्धेसाठी संघातून वगळण्यात आले. याचे मला खूप वाईट वाटले. पण, त्यानंतर मला माहित होते की आयपीएलचा दुसरा टप्पा आता जवळ येणार आहे. त्यामुळे अधिक काळ या तणावाखाली न राहता मी आयपीएलवर लक्ष दिले.”

चहल आय़पीएल 2021 मध्ये चमकला

चहलने आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात उत्तम कामगिरी केली. चहलने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळताना 8 सामन्यात 14 विकेट्स घेतल्या. आरसीबी प्लेऑफपर्यंतही गेली. दरम्यान, याच कामगिरीच्या जोरावर चहलची पुन्हा एकदा संघात एन्ट्री झाली आहे. न्यूझीलंडविरुद्ध सामन्यांमध्ये चहलला संघात स्थान देण्यात आलं आहे.

इतर बातम्या

T20 WC : डेव्हिड वॉर्नरने कर्णधाराचा शब्द राखला, फिंचने केलेली भविष्यवाणी खरी ठरवली

Video: विश्वचषक जिंकताच ऑस्ट्रेलियन खेळाडूंच अजब सेलिब्रेशन, बुटातून घेतला ड्रिंक्सचा आस्वाद, नेमकं कारण काय?

भारतीय संघाचं प्रशिक्षक पद सोडताच रवी शास्त्रींकडे नवी कामगिरी, लवकरच दिसणार नव्या भूमिकेत

(Yuzvendra Chahal first time opens up after not getting place in T20 World Cup team)