टीम इंडियाने झिंबाब्वेला पाचव्या आणि शेवटच्या टी 20 सामन्यात 42 धावांनी पराभूत करत 4-1 अशा फरकाने मालिका जिंकली. टीम इंडियाने झिंबाब्वेसमोर 168 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र झिंबाब्वेचा डाव 18.3 ओव्हरमध्ये 125 धावांवर आटोपला. टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडने शुबमन गिल याच्या नेतृत्वात हा मालिका जिंकली. या मालिकेतून युवा खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. तसेच या मालिकेत अनेक विक्रम झाले. मात्र यशस्वी जयस्वाल याने केलेल्या विक्रमाची सध्या एकच चर्चा पाहायला मिळतेय. यशस्वीने असा विक्रम केलाय, जो याआधी कुणालाच जमला नाही. यशस्वीने चक्क 1 बॉलमध्ये 12 धावा केल्या आहेत.
झिंबाब्वेने टॉस जिंकला. कॅप्टन सिकंदर रझा याने फिल्डिंगचा निर्णय घेत टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाकडून कॅप्टन शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वाल ही सलामी जोडी मैदानात आली. यशस्वीने स्ट्राईक घेतली. तर झिंबाब्वेकडून सिकंदर रझा पहिली ओव्हर टाकायला आला. पहिलीच ओव्हर सिकंदर रझा टाकायला आल्याने क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र त्यानंतर पुढे जे झालं, त्याचा विचारही कुणी केला नाही.
यशस्वीने टीम इंडियाच्या डावाची सुरुवात सिक्सने केली. यशस्वीने सिकंदरच्या पहिल्याच बॉलवर कडक सिक्स खेचला. मात्र पहिलाच बॉलवर नो बॉल ठरला. त्यामुळे यशस्वीला फ्री हिट मिळाला. यशस्वीने या संधीचा पूर्ण फायदा घेतला. यशस्वीने फ्री हिटवरही कडक सिक्स ठोकला. यशस्वीने अशाप्रकारे 1 बॉलमध्ये फ्री हिटच्या मदतीने 2 सिक्ससह 12 धावा केल्या. तर अतिरिक्त 1 धावेसह 2 सिक्सच्या 12 अशा एकूण 13 धावा टीम इंडियाच्या खात्यात जमा झाल्या.
यशस्वी जयस्वालच्या 1 बॉलमध्ये 12 धावा
.@ybj_19 started the final T20I of the Zimbabwe tour with a flourish 💥💥#SonySportsNetwork #ZIMvIND #TeamIndia | @BCCI pic.twitter.com/7dF3SR5Yg1
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 14, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रियान पराग, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे आणि मुकेश कुमार.
झिम्बाब्वे प्लेइंग ईलेव्हन : सिकंदर रझा (कर्णधार), वेस्ली मधेवेरे, तादिवानाशे मारुमणी, ब्रायन बेनेट, डिओन मायर्स, जोनाथन कॅम्पबेल, फराज अक्रम, क्लाइव्ह मदांडे (विकेटकीपर), ब्रँडन मावुता, रिचर्ड नगारावा आणि ब्लेसिंग मुझाराबानी.